विश्रांतवाडी, दि. 21 (रफिक शेख) :- पवित्र रमजान महिन्याचे औचित्य साधून विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात समस्त मुस्लिम बांधवांसाठी खास रोजा इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. या प्रसंगी “प्रहार”चे प्रसिध्दी प्रमुख रफीक खान यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, “दोन पी म्हणजे पोलिस व पब्लिकमध्ये जी पोकळी व दुरावा निर्माण झाला होता तो आता नाहीसा होत आहे. आपण फार भाग्यवान आहोत की आपण भारत देशात जन्म घेतला कारण फक्त आपल्याच देशात एका बाजूने अजानची बांग येते तर दुसऱ्या बाजूने आरती-अर्चनाची आवाज येते आणि मध्येच कुठेतरी गॉड ब्लेसही आवाज आपल्याला ऐकू येतं, त्या सगळ्यांमध्ये बैसाखीची ही धमक आपल्याला ऐकू येते हे सर्व आपल्याला फक्त आपल्या भार देशांमध्येच पाहायला आणि ऐकायला मिळत आहे. ईदमध्ये आम्ही सर्व पोलिसांनापण सांगत आहोत की कृपया करून आपण आपल्या घराचे चूल बंद करून आमच्या आमंत्रण स्वीकारा आणि आम्हालाही आपली सेवा करण्याची द्यावी. ज्याप्रकारे आम्ही आपले आमंत्रण स्विकारून आज येथे आलो त्याचप्रमाणे आपणही आमच्या विनंतीचा मान राखावा. धन्यवाद जय हिंद”
सदर कार्यक्रमाचे आयोजन शशिकांत बोराटे पोलीस उपायुक्त परिमंडळ 4 पुणे शहर, आरती बनसोडे सहाय्यक पोलीस आयुक्त खडकी विभाग, दत्तात्रय भापकर वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्रांतवाडी पोलीस स्टेशन, माळी सहाय्यक पोलीस निरीक्षक, सातपुते पोलीस उपनिरीक्षक, चव्हाण पोलीस उपनिरीक्षक, सौ. शुभांगी मगदूम पोलीस उपनिरीक्षक, गणेश पारडे पोलीस नाईक विश्रांतवाडी पोलीस स्टेशन, माजी नगर सेवक आयुब शेख, विनोद पवार, संजय (सायबु) चव्हाण, आशुतोष जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.












Users Today : 5
Users Yesterday : 4
Users This Month : 198
Users This Year : 771
Total Users : 42539
Views Today : 8
Total views : 59570
Who's Online : 0