वानवडी, दि. २१ (महाराष्ट्र मंथन) :- वानवडी भागातील एका १४ वर्षीय विद्यार्थ्याचा क्रिकेट खेळताना अचानक हृदय विकाराचा झटका येवून मृत्यु झाला आहे. वानवडी पोलिस ठाण्यात याची अकस्मात मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे. वेदांत शिवाजी धामणकर असे या विद्यार्थ्याचे नाव असून इंग्रजी शाळेत शिकत होता. सदर घटना ही अत्यंत हृदयद्रावक असल्याने संपूर्ण परिसरातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
क्रिकेट खेळतांना हृदयविकाराचा झटका येऊन मृत्यू झाल्याच्या अनेक घटना गेल्या काही काळात बघायला मिळत आहे. काही दिवसापूर्वीच एका तरुण खेळाडूचा मैदानात हृदय विकाराचा झटका येऊन मृत्यू झाल्याचा व्हिडीओ समोर आला होता. आता त्यानंतर महाराष्ट्रातही अशीच एक दुर्दैवी घटना घडली आहे.
परंतु हि घटना सर्वाना अचंबित करणारी आहे कारण यावेळी मृत्यू झालेला खेळाडू केवळ आठवीतील आहे.
गुरुवारी सकाळ वेदांत मित्रांबरोबर क्रिकेट खेळायला गेला असता. क्रिकेट खेळत असतांना त्याच्या छातीत दुखू लागल्याने त्याच्या वडिलांच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधून त्यांना बोलावले. त्यानंतर वेदांतला आई-वडिलांनी तातडीने वानवडीतील एका जवळच्या रुग्णालयात दाखल केले. वेदांत बेशुद्ध पडल्याने डॉक्टरांनी त्याला मोठ्या रुग्णालयात दाखल करण्यास सांगितले. वेदांतला फातिमानगर परिसरात असलेल्या एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. त्यावर डॉक्टरांनी हृदयविकाराच्या धक्क्याने वेदांतचा मृत्यू झाल्याचे सांगितले.












Users Today : 3
Users Yesterday : 4
Users This Month : 196
Users This Year : 769
Total Users : 42537
Views Today : 4
Total views : 59566
Who's Online : 0