सेनगाव, दि. ३० (महाराष्ट्र मंथन) :- दहावीच्या परिक्षेनंतर घरी राहण्यासाठी आलेल्या मुलीवर ५५ वर्षीय नराधम पित्यानेच अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी सेनगाव पोलिस ठाण्यात शनिवारी (ता. २९) रात्री गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी तातडीने या नराधम पित्याला अटक केली आहे.
मामाकडे राहत होती मुलगी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सेनगाव येथील या ५५ वर्षीय आरोपीची पंधरा वर्षापुर्वीच पत्नीसोबत फारकत झाली होती. त्यामुळे त्याची एक वर्षाची मुलगी तिच्या मामाकडे शिक्षणासाठी राहाते. मागील काही वर्षांपासून त्या मुलीसोबत पित्याने संपर्क ठेवला होता. त्यानंतर तिची दहावीची परिक्षा झाल्यामुळे तिला घरी राहण्यासाठी पाठविण्याची विनंती त्याने मुलीच्या मामाकडे केली होती. त्यानुसार पंधरा दिवसांपुर्वी मुलगी तिच्या वडिलांकडे राहण्यासाठी आली. अत्याचारानंतर जीवे मारण्याची धमकी दरम्यान, ता. १८ एप्रिल रोजी त्याने मुलीसाठी गुलाब जामून, भेळ व कलाकंद खाण्यासाठी आणले. हे सर्व पदार्थ खाल्यानंतर मुलीस झोप आली. याचा गैरफायदा घेत तिच्या पित्यानेच तिच्यावर अत्याचार केला. सलग तीन दिवस पित्यानेच अत्याचार केला अन जिवे मारण्याची धमकी दिल्याने मुलगी घाबरून गेली. त्यानंतर त्याने पुन्हा २२ एप्रिल रोजी अत्याचार केल्यानंतर मुलगी आणखीच घाबरली. तिने सदर प्रकार तिच्या मामाला सांगितला. यावरून तिच्या मामाने तिला घेऊन थेट सेनगाव पोलिस ठाणे गाठले. या प्रकरणी त्या मुलीच्या तक्रारीवरून नराधम पित्याविरुध्द अत्याचार प्रकरणी गुन्हा दाखल झाला.
या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिस अधिक्षक जी. श्रीधर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक रणजीत भोईटे, उपनिरीक्षक अच्यूत मुपडे यांच्या पथकाने तातडीने पित्याचा शोध घेऊन त्याला अटक केली आहे.












Users Today : 8
Users Yesterday : 4
Users This Month : 201
Users This Year : 774
Total Users : 42542
Views Today : 17
Total views : 59579
Who's Online : 0