पिंपरी, दि. ०२ (महाराष्ट्र मंथन) :- शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखालीच आम्ही आमची आजपर्यंतची राजकीय वाटचाल केली आहे. शरद पवार हे आमचे दैवत आहेत. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली आम्ही यापुढेही कार्यरत राहणार आहोत. त्यांनी राजीनामा मागे घ्यावी, अशी आमची सर्वांची इच्छा असून त्यांनी राजीनामा मागे न घेतल्यास आम्हीही सामूहिक राजीनामा देऊ, अशी जाहीर भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी जाहीर केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज (दि. २) निवृत्तीची घोषणा केल्यानंतरराष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते भावूक झाले. शरद पवार यांनी अचानक घेतलेला निर्णय हा कार्यकर्त्यांना मोठा धक्का देणारा ठरला आहे. त्याबाबत अजित गव्हाणे यांनी एक पत्रक प्रसिद्धीस दिले असून त्यात म्हटले आहे की, आमच्या राजकारणाची सुरुवातच शरद पवार यांच्याकडे पाहून झाली आहे. ते आमचे दैवत आणि राजकीय आदर्श आहेत. शरद पवार हेच पक्षाचे अध्यक्ष असायला हवेत, अशी आमची सर्वांची इच्छा आहे. त्यामुळे त्यांनी राजीनामा मागे घ्यावा, अशी आम्ही मागणी करत असल्याचेही गव्हाणे यांनी या पत्रात म्हटले आहे. दरम्यान, शरद पवार यांनी राजकीय निवृत्तीची घोषणा करताच त्याचे पडसाद पिंपरी-चिंचवड शहर राष्ट्रवादीमध्येही उमटले. पक्षाच्या सर्वच माजी नगरसेवकांसह, आजी माजीपदाधिकारी व कार्यकर्ते खराळवाडी येथील पक्ष कार्यालयात जमा झाले होते. त्यावेळी सर्वांनी शरद पवार यांनी राजीनामा मागे घ्यावा अशी मागणी केली.
यावेळी बोलताना राष्ट्रवादीच्या महिला शहराध्यक्ष म्हणाल्या, राजकारणात तब्बल ६३ वर्ष काम करणारे, राजकारण आणि समाजकारणाचे चालते फिरते विद्यापीठ म्हणूनआम्ही त्यांच्याकडे पाहतो. आमचे राजकीय क्षेत्रातील काम त्यांच्यामार्गदर्शनाशिवाय होऊ शकत नाही. साहेबांनी त्यांचा निवृत्तीचा निर्णय तातडीने मागे घ्यावा.
यावेळी पक्षाचे शहर कार्याध्यक्ष तथा माजी स्थायी समिती अध्यक्ष प्रशांत शितोळे म्हणाले, पक्षाध्यक्षपदी शरद पवार यांनीच यापुढेही कार्यरत रहावे. त्यामुळे आम्हाला उर्जा मिळत राहील. शरदपवार साहेब यांनी अध्यक्षपदी राहिले पाहिजेत,अशी आमची सगळ्यांची इच्छा असल्याने त्यांनी आपलाराजीनामा मागे घ्यावा.
यावेळी ओबीसी सेल अध्यक्ष विजय लोखंडे, वाहतूक सेल अध्यक्ष काशिनाथ जगताप, सामाजिक न्याय विभागाचे अध्यक्ष संजय औसरमल, अकबर मुल्ला, किरण देशमुख, दत्तात्रय जगताप, मनीषाताई गटकळ, लाल मोहम्मद चौधरी, शक्रुल्ला पठाण, शाम जगताप, तानाजी जवळकर, कविताताई खराडे, सविताताई धुमाळ,लताताई ओव्हाळ, दिपालीताई देशमुख, विजयाताई काटे, राजेश हरगुडे, ज्योतीताई गोफणे, राजू खंडागळे, राहुल आहेर, शादाब खान, पियुश अंकुश, प्रियाताई देशमुख, आशाताई मराठे, मेघराज लोखंडे, धनाजी तांबे, सुनील आडागळे, गणेश हरजुळे, इत्यादी पदाधिकाऱ्यांसह पक्षाचे माजी नगरसेवक व अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.












Users Today : 7
Users Yesterday : 4
Users This Month : 200
Users This Year : 773
Total Users : 42541
Views Today : 13
Total views : 59575
Who's Online : 0