पिंपरी, दि. १३ (शफीक शेख):- आगामी गणेशोत्सव सणांच्या अनुषंगाने गुन्हेगारी वृत्तीस आळा घालणेकामी व गुन्ह्यांना प्रतिबंध करणेकामी पोलीस स्टेशनचे रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगारांवर कारवाई करण्यासाठी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयांतर्गत असलेल्या परिमंडळ ०२ अंतर्गत येणारे पोलीस स्टेशन कडील गुन्हेगारी पार्श्वभुमी असलेले सक्रिय गुन्हेगारांना पुणे शहर व पिंपरी चिंचवड आयुक्तालय हद्दीतुन मुबंई पोलीस अधिनियम १९५९ चे कलम ५६ खाली हद्दपारीबाबतचे आदेश पारित करण्यात आले.
सदरचे आदेश पिंपरी-चिंचवड शहराचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्या आदेशान्वये पोलीस सहआयुक्त शशिकांत महावरकर व अपर पोलीस आयुक्त, सारंग आवाड, गुन्हे, अपर पोलीस आयुक्त, प्रादेशिक विभाग बसवराज तेली यांचे मार्गदर्शनाखाली सदरची कारवाई करण्यात आली.


Author: Maharashtra Manthan
Post Views: 90









