पिंपरी, दि. ५ (महाराष्ट्र मंथन) :- भारतीय जनता पक्षाच्या राजवटीत देशांमध्ये असंतोषाचे वातावरण आहे. अशा वातावरणात शरद पवार यांच्या सारख्या अनुभवी आणि मुत्सद्दी नेत्यांची देशाला गरज आहे. त्यामुळे पवार साहेबांनी पक्षाचे अध्यक्ष पद सोडू नये, अशी आमच्या सारख्या कार्यकर्त्यांनी तीव्र भावना होती. पवार साहेबांनी कार्यकर्त्यांच्या भावनांचा आदर केल्याबद्दल त्यांचे मनापासून आभार मानतो, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
खासदार शरद पवार यांनी पक्षाच्या अध्यक्ष पदाचा राजीनामा माघार घेतल्याबद्दल शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने खराळवाडी येथील पक्ष कार्यालयात शुक्रवारी (दि.5) सायंकाळी फटाके फोडून, पेटे वाटून आनंदोत्सव साजरा केला. यावेळी गव्हाणे बोलत होते.
गव्हाणे पुढे बोलताना म्हणाले की, पवार साहेबांनी पक्षाच्या अध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्यानंतर राज्यातील सर्व राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना मोठ्या प्रमाणात दुःख झाले होते. त्यांनी राजीनामा मागे घ्यावा, म्हणून अनेक पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले होते. तर मुंबईत पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या आंदोलन सुरू होते. तसेच नवीन अध्यक्ष निवडीसाठी समिती नेमली होती. मात्र, समितीच्या सर्व सदस्यांनी पवार साहेबांनीच पक्षाच्या अध्यक्षपदी कायम राहावे, अशी मागणी करत राजीनामा फेटाळला. अखेर पवार साहेबांनी कार्यकर्त्यांच्या भावनांचा आदर करून राजीनामा मागे घेतल्याबद्दल त्यांचे मनापासून आभार मानतो.
आनंदोत्सवाला शहराध्यक्ष अजित गव्हाणे , माजी महापौर संजोग वाघेरे पाटील , माजी विरोधी पक्षनेते विठ्ठल उर्फ नाना काटे, कार्याध्यक्ष राहुल भोसले, महिला अध्यक्ष कविता आल्हाट, युवक अध्यक्ष इम्रान शेख, शाम लांडे, विनोद नढे, पंकज भालेकर, प्रवक्ते विनायक रणसुभे, सतीश दरेकर, राजेंद्र जगताप, वसंत बोराटे, शशिकिरण गवळी, ओबीसी सेल अध्यक्ष विजय लोखंडे, संजय औसरमल, अकबर मुल्ला, दत्तात्रय जगताप, मनीषा गटकळ , काशिनाथ जगताप, देवेंद्र तायडे, दीपक साकोरे, ज्ञानेश्वर कांबळे, विशाल आहेर, विजय पिरंगुटे, निर्मला माने, सचिन औटे, युवराज पवार, अरुण पवार, दत्ता बनसोडे, सुनील कुसाळकर, विजय दळवी, अनंत सुपेकर, विशाल आहेर, भूपेंद्र तामचीकर, लता ओवाळ, मीरा कदम, आयुष निंबाळकर, राजन नायर, सुदाम शिंदे, अनिल भोसले, अनिल भोसले, बाळासाहेब जगताप, राजू खंडागळे, ओम क्षिरसागर, अण्णा पाखरे, निखिल घाडगे, सुप्रिया सोळाकुरे, ॲड. विशाल जाधव, सुरज पटेल, ओम शिरसागर, ऋषी गोळे, विकास कांबळे, रुबान शेख, रजनीकांत गायकवाड, अमोल बेंद्रे, इम्रान शेख, अशोक पोटे, धनाजी तांबे, सुनील आडागळे, गणेश हरजुळे इत्यादीपदाधिकाऱ्यांसह पक्षाचे माजी नगरसेवक व अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.












Users Today : 7
Users Yesterday : 4
Users This Month : 200
Users This Year : 773
Total Users : 42541
Views Today : 11
Total views : 59573
Who's Online : 0