तळेगाव दाभाडे, दि. १२ (महाराष्ट्र मंथन):- जनसेवा विकास समितीचे संस्थापक अध्यक्ष किशोर आवारे यांच्यावर तळेगाव नगरपरिषदेच्या कार्यालयासमोर प्राणघातक हल्ला झाला. यात ते जखमी झाले असून त्यांच्यावर सोमाटणे फाटा येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, किशोर आवारे हे तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांची भेट घेऊन खाली आले होते. त्यावेळी दबा धरून बसलेल्या चार जणांनी त्यांच्यावर खूनी हल्ला केला. त्यापैकी दोघाजणांनी गोळीबार केला. तर दोन जणांनी कोयत्याने वार केले. आवारे हे रक्ताच्या थारोळ्यात पडल्यानंतरही हल्लेखोर काहीवेळ तिथेच थांबून होते. जखमी अवस्थेतील आवारे यांना सोमाटणे फाटा येथील खासगी रुग्णालयात दाखल केले असून त्यांच्यावर उपचार सुरू होते. परंतु शर्थीचे प्रयत्न करूनही डॉक्टरांना त्यांना वाचविता आले नाही आणि आवारे यांची आत्मा अनंतात विलीन झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
जनसेवा विकास समितीच्या माध्यमातून तळेगाव शहरात विविध सामाजिक उपक्रमांद्वारे त्यांची समाजाशी नाळ जोडली होती. आवारे सहा वर्षापूर्वी झालेल्या तळेगाव नगरपरिषद निवडणुकीत जनसेवा विकास समितीचे नगरसेवक म्हणून निवडून आले होते. किशोर आवारे यांच्या प्राणघात हल्ला झाल्याची घटना समजताच तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. या घटनेमुळे तळेगाव शहरात तणावाचे वातावरण आहे. पोलीस हल्लेखोरांचा शोध घेत आहेत. वरिष्ठ पोलिस अधिकार्यांनी देखील घटनास्थळी धाव घेतली आहे. किशोर आवारेंचा गोळीबार करून खून झाल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे.












Users Today : 8
Users Yesterday : 4
Users This Month : 201
Users This Year : 774
Total Users : 42542
Views Today : 16
Total views : 59578
Who's Online : 0