वाकड येथील पंचतारांकित हॉटेमधील चालणा-या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश

वाकड, दि. 13 (महाराष्ट्र मंथन) :- वाकड येथील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये अवैधरित्या वेश्याव्यवसाय करताना एका भोजपुरी फिल्म अभिनेत्रीसह एका मॉडेलिंग काम करणा-या तरूणीची वाकड पोलिसांनी त्यांच्या दलालांकडून सुटका केली आहे. या प्रकरणी एका दलालास अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. या कारवाईमुळे पुन्हा एकदा उच्चभ्रू परिसरातील पंचतारांकित हॉटेलमध्ये चालणा-या अवैधरित्या वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश झाला आहे आणि या मोठया लोकांच्या उजेडामागील काळी बाजू उघडी पडली आहे.
पिंपरी चिंचवड येथील पंचतारांकीत हॉटेल मध्ये काही दलाल स्वतःचे आर्थिक फायदयासाठी अवैधरित्या अभिनेत्री व मॉडेल यांना जास्त पैशाचे अमिष दाखवून वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडतात. अशी माहिती अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंधक कक्ष विभाग, गुन्हे शाखेकडील पोलीस अधिकारी व अंमलदार यांना प्राप्त झाल्यानंतर अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष, गुन्हे शाखेकडील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी दिनांक ११/०५/२०२३ रोजी सापळा रचून, बनावट ग्राहका करवी वेश्यागमनासाठी मुलींबाबत विचारणा केली असता, दलालाने वाकड परिसरातील पंचतारांकित हॉटेल येथे रुम बुक करण्यास सांगितल्या. त्यानंतर सदर ठिकाणी दोन मुली हॉटेल मधील बनावट ग्राहक थांबलेल्या रुममध्ये आल्यानंतर अचानक छापा टाकला असता, सदर ठिकाणी दोन मुलींना ताब्यात घेवून विचारपूस केली असता, दलाल हा जवळच आजूबाजूच्या परिसरात असल्याची माहिती मिळाल्याने लागलीच दोन पिडीत महिला व एक दलाल (आरोपी) यास ताब्यात घेण्यात आले.
वाकड पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. ४६२ / २०२३ भादवि कलम ३७० (३), ३४ सह अनैतिक व्यापार (प्रतिबंध) अधिनियम १९५६ चे कलम ४, ५ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असून दोन पिडीत मुलींची सुटका करण्यात आली आहे. सदरची एक पिडीत मुलगी भोजपुरी अभिनेत्री व एक पिडीत मुलगी ही मॉडेलिंग करीत असल्याचे तपासात निष्पन्न झालेले आहे. पुढील तपास वाकड पोलीस स्टेशन कडील पोलीस अधिकारी करीत आहेत.
सदरची कारवाई मा. पोलीस आयुक्त श्री. विनय कुमार चौबे, मा. पोलीस सह आयुक्त श्री. डॉ. संजय शिंदे, मा. अपर पोलीस आयुक्त श्री. वसंत परदेशी, मा. पोलीस उप-आयुक्त (गुन्हे) स्वप्ना गोरे मॅडम, मा. सहा. पोलीस आयुक्त (गुन्हे) डॉ. प्रशांत अमृतकर यांचे मार्गदर्शनाखाली अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंधक कक्षातील पोलीस निरीक्षक देवेंद्र चव्हाण, पोउपनि प्रदिपसिंग सिसोदे, धैर्यशिल सोळंके, विजय कांबळे, पोलीस अमंलदार सुनिल शिरसाट, सुधा टोके, भगवंता मुठे, मारुती करचुंडे, वैष्णवी गावडे, सोनाली माने यांनी केली आहे.

Leave a Comment

READ MORE