हडपसर रामनगर येथून सुमारे 15 दिवसांपासून बेपत्ता बिलाल मोमिनला शोधण्यात पोलीस प्रशासन अयशस्वी

हडपसर, दि. 15 (महाराष्ट्र मंथन) :- रामनगर, हडपसर येथून दिनांक 4 मे 2023 रोजी सकाळी 10 वाजलेपासून बिलाल रफिक मोमिन हा 17 वर्षिय मुलगा बेपत्ता आहे. त्याच्या कुटुंबाच्या सदस्यांनी सर्वत्र शोधले परंतु निराश हाती आल्याने त्यांनी पोलीस प्रशासनाकडे मदत मागितली. त्याप्रमाणे दिनांक 9 मे 2023 रोजी वानवडी पोलीस ठाण्याचे ठाणे अंमलदार भाउसाहेब गोविंदराव यांनी एफआयआर क्रमांक 0212 नुसार तक्रार नोंदविली. आज या तक्रारीस 7 दिवसांचा कालावधी उलटला असतानाही वानवडी पोलिसांकडून कोणतीही कार्यवाही करण्यात येत नाही. सदर बेपत्ता मुलाचे वडिल रफिक दाउद मोमिन आणि त्यांचे कुटुंबिय वारंवार पोलीस ठाण्यात येवून चकरा मारीत आहेत परंतु दरवेळेस त्यांच्या पदरी निराशाच लागत आहे.
या वृत्ताद्वारे आम्ही आमच्या वाचकांना विनंती करितो कि त्यांना जर कोठे बिलाल रफिक मोमिन वय वर्षे 17, सडपातळ शरिरयष्टि, सडपातळ, उंची 5 फुट, रंगाने सावळा, केस वाढलेले, चेहरा गोल, डोळयावर नंबरचा चष्मा नेसणीस पिस्ता कलरचा पायजमा कुर्ता, डोक्यावर टोपी, पायात पांढ-या रंगाची सॅंडेल, भाषा हिंदी, इंग्रजी, मराठी बोलता येते, जवळ स्कूलबॅगमध्ये त्याचे आधारकार्ड, रोजचे वापराचे कपडयांचे चार -पाच जोड, दहावीचे मार्कलिस्ट, शाळेचा दाखला, मदरसा फैजुल उलूम दापोडी दाखला, स्वतःचे पासपोर्ट साईज फोटो तसेच ब्राउन कलरची चादर अशा वर्णनाचा मुलगा कोठेही आढळल्यास त्यांनी त्वरित स. नं. 108 रामनगर, हडपसर, पुणे 13 मोबाईल क्रमांक 9823738931 किंवा 8554065670 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे कळकळीचे आवाहन सदर मुलाच्या आई वडिलांनी केले आहे.

Leave a Comment

READ MORE