निगडी, दि. 19 (महाराष्ट्र मंथन) :- काका आणि पुतणी या पवित्र नात्याला काळीमा फासणारी घटना निगडी दळवी नगर येथे दिनांक 15 मे रोजी घडली. येथील एका नराधम काकाने आपल्याच भावाच्या सात वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार केले.
किसन भगत वाघीरे वय २८ वर्षे रा. गुरुदत्त हौ. सोसा. बी. न. एफ २ रुम न. ४१३ दळवीनगर ओटास्किम निगडी पुणे असे या नराधम काकाचे नाव आहे. याची फिर्याद या मुलीची आई हिने निगडी पोलीस ठाण्यात दिली.
याबाबत निगडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गिरी गोसावी साहेब यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी माहिती दिली की उपरोक्त ठिकाणी फिर्यादी महिला तिची सात वर्षाची मुलगी तिचा नवरा आणि तिचा दीर असे राहावयास आहे. दिनांक 15 मे रोजी फिर्यादी महिला कामावर गेले असता घरात आरोपीची पुतणी ही एकटी असलेले पाहून या नराधम काकाने दरवाजा बंद करून तिच्यावर लैंगिक अत्याचार केले आणि तो तेथून फरार झाला. घरी परतल्यानंतर मुलीने आईला घडलेली सर्व घटना सांगितल्यानंतर तिच्या आईने निगडी पोलीस ठाण्यात याविषयी तक्रार दिली प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन तातडीने सदर आरोपी किसन भगत वाघिरे यांच्या विरोधात निगडी पोलिसांनी भा.द.वि कलम ३७६, ३७६ (अ), (ब), ३७७ लैगिक अपराधापासून बालकांचे संरक्षण कायदा २०१२ कलम ४,६ नुसार गुन्हा दाखल केला. परंतु तक्रार देण्यात उशीर झाल्याने आरोपी वाघिरे यास पलायन करण्यास वेळ मिळाला आणि तो फरार झाला. निगडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. मुंडे साहेब यांच्या मार्गदर्शनानुसार आम्ही सदर आरोपीच्या गावी त्याचा शोध घेण्यासाठी जाणार आहोत अशी माहिती श्री. गिरीगोसावी यांनी दिली.
सदर प्रकारामुळे संपूर्ण परिसरात नागरिकांमधून संताप्त प्रतिक्रिया येत आहेत पोलिसांनी लवकरात लवकर आरोपीस अटक करून त्यास कठोर शिक्षा करण्यास मदत करावी, असे नागरिकांमधून बोलले जात आहे.












Users Today : 7
Users Yesterday : 4
Users This Month : 200
Users This Year : 773
Total Users : 42541
Views Today : 11
Total views : 59573
Who's Online : 0