पिंपरी, दि. 22 (महाराष्ट्र मंथन) : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उद्देशून ‘फौजदाराचा हवालदार झाला’ हे वाक्य जिव्हारी लागल्यामुळे भाजप नेत्यांनी राजकीय सूडबुद्धीने त्यांच्यावर ईडीची कारवाई सुरू केली असल्याचा आरोप पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष इम्रान शेख यांनी केला.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना ईडीने नोटीस पाठविल्याच्या निषेधार्थ पिंपरी-चिंचवड युवक काँग्रेसतर्फे शहरात आंदोलन करण्यात आले होते. यावेळी शेख बोलत होते.
पुढे बोलताना इम्रान शेख म्हणाले, “जयंत पाटील हे उच्चविद्याविभूषित,चारित्र्यसंपन्न आणि निष्कलंक नेते आहेत. त्यांचे 40 वर्षांचे सार्वजनिक व राजकीय जीवन हे एक खुले पुस्तक आहे. मात्र सध्या त्यांच्यावर राजकीय आकसाने ईडी कारवाई केली जात असल्याच्या संतप्त भावना यावेळी व्यक्त केली. या 9 वर्षात भाजपच्या एकाही आमदार खासदारांना ईडीची नोटीस आल्याची एकही बातमी नाही. परंतु महाविकास आघाडीच्या सर्व प्रमुख नेत्यांना जाणून-बुजून सरकारी यंत्रणेच्या माध्यमातून त्रास देण्याचे काम हे फॅसिस्ट सरकार करत असल्याचा आरोप देखील त्यांनी लावला.
यावेळी “भाजपा वॉशिंग मशीन आणि ईडी वॉशिंग पावडर” याचं प्रात्यक्षिक सादर करून भाजपकडून विरोधकांना नामोहरम करण्यासाठी ईडीचा कशाप्रकारे वापर केला जातो, हे दाखवण्यात आले. आंदोलनाप्रसंगी देवेंद्र तायडे, राजन नायर, तानाजी खाडे, युवराज पवार, मीरा कदम, राजेंद्रसिंग वालिया आदी पदाधिकाऱ्यांची भाषणे झाली.
याप्रसंगी राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे “ईडी भाजपचा घरगडी” “भाजप हमसे डरती है ईडी को आगे करती है” “भाजपचा हवालदार काय करतो ईडीच्या नोटीस वाटत फिरतो” “ईडी सरकार हाय हाय” अशी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
या आंदोलनात प्रदीप गायकवाड,राहुल पवार, ओम क्षिरसागर,राजू खंडागळे, विकास कांबळे, संजय औसरमल, प्रकाश सोमवंशी, सतीश दरेकर, कविता खराडे, मनिषा गटकळ, निकिता कदम, पीयूष अंकुश, सनी वाघमारे, सारीका पवार, रामभाऊ आव्हाड, केतन होके, विकास वाघमारे, श्रीधर वाल्हेकर, निखिल घाडगे, सागर वाघमारे, तुषार ताम्हाणे, संकेत जगताप, पूनम वाघ, मीरा कदम, संगीता कोकणे, इरफान शेख, बाळासाहेब पिल्लेवार, अकबर मुल्ला, सुदाम शिंदे, अभिजित आल्हाट, राजेश हरगुडे, सचिन वाल्हेकर, आकाश शिंदे, मयूर खरात, अजय पवार, दिनेश गंगावणे, शाहीद शेख, अनुज देशमुख, संकेत उबाळे आदींसह युवक पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.












Users Today : 5
Users Yesterday : 4
Users This Month : 198
Users This Year : 771
Total Users : 42539
Views Today : 9
Total views : 59571
Who's Online : 0