खेड/म्हाळुंगे, दि. 22 (महाराष्ट्र मंथन) :- शेतकरी महिला आणि तिचे मूकबधिर शेतकरी पती नवनाथ गाडे यांची भांबोली गावातील वडिलोपार्जित ३४ गुंठे शेत जमीन असल्याने सदरची जमीन विकून देतो असे सांगून आरोपी विशाल माणिक राऊत आणि माणिक देवराम राऊत (दोघे राहणार – बालाजी नगर मेदनकरवाडी चाकण तालुका खेड जिल्हा पुणे) यांनी विश्वासघात करून शेतकरी कुटुंबाची ३१ लाखाची फसवणूक केली आणि त्याच शेतकरी कुटुंबाची भांबोली येथील गट क्रमांक ६२/१ मधील १४५ गुंठे जमीन विशाल राऊत आणि त्याचे वडील माणिक राऊत यांनी इतर साथीदार आणि साक्षीदार काळुराम पंडित मोहिते आणि मयूर सुनील मोहिते (दोघे राहणार – मोहितेवाडी शेळ पिंपळगाव खेड) यांनी संगणमत करून शेतकरी कुटुंबाची मालकी हक्काची जमीन विक्री करण्यासाठी विश्वासाने विशाल माणिक राऊत यांनी कबुली जबाबाचे कुलमुखत्यार पत्र करून घेतले व कोऱ्या कागदावर घेतलेल्या सह्या व अंगठ्याच्या ठशांचा वापर करून विशाल माणिक राऊत याने वडील माणिक देवराम राऊत यांच्या नावे सदर जमिनीचे साठेखत दस्त केला व बँकेतील खात्यात ७५ लाख रुपये शेतकऱ्याला दिल्याचे भासवून बनावट दस्त तयार करून फसवणूक केली सदर आरोपी विशाल राऊत आणि माणिक राऊत आणि त्यांचे साथीदार यांनी एकत्रितपणे संगणमत करून शेतकऱ्यांची फसवणूक केली व सदर विषयी खेड पोलीस ठाण्यात ४२०, ४६७, ४६८,४७१ व ३४ प्रमाणे दिनांक १७/०५/२०२३ रोजी गुन्हा दाखल झाला.
म्हाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यातील दाखल गुन्ह्यातील आरोपी विशाल माणिक राऊत आणि माणिक राऊत यांच्यातील माणिक राऊत यांना जामीन मंजूर झाला असून विशाल राऊत हा आरोपी अजूनही फरार आहे. खेड पोलीस ठाण्यातील दाखल गुन्ह्यातील आरोपी माणिक राऊत यांना पोलिसांनी अटक केली व न्यायालयात हजर केले असता चार दिवस पोलीस कोठडी सुनावण्यात आली त्यानंतर २२/०५/२०२३ रोजी पोलिसांनी आरोपी माणिक राऊत यांना न्यायालयात हजर केले असता न्यायाधीशांनी दोन दिवस पोलीस कोठडी सुनावली. विशाल माणिक राऊत, काळुराम मोहिते, मयूर मोहिते हे अद्याप फरार आहेत.
दोन्ही गुन्ह्यातील मास्टरमाईंड विशाल राऊत पोलिसांना चकवा देत फरार आहे, का पोलीस शोध घेत नाहीत असा प्रश्न स्थानिकांनी उपस्थित केला आहे. सदर आरोपीला पोलिसांनी लवकरात लवकर ताब्यात घ्यावे आणि सदर आरोपीने इतर कोणाची फसवणूक केली असल्यास पोलिसांशी संपर्क करावा असे आव्हान करावे असे मत नागरिकांनी व्यक्त केले.












Users Today : 1
Users Yesterday : 7
Users This Month : 73
Users This Year : 473
Total Users : 42241
Views Today : 1
Total views : 58521
Who's Online : 0