(महाराष्ट्र मंथन)
प्रतिनिधी – पिंपरी-चिंचवड आम आदमी पक्षाच्यावतीने चिंचवड पोटनिवडणुकीत उमेदवारी मिळालेले श्री. मनोहर नामदेव पाटील यांनी आम आदमी पक्षाला राम राम ठोकून तसेच तेलंगणा सरकार यांचे तेलंगणा येथील काम पाहून शेतकरी, मजुर, कष्टकरी, व दलित बंधु यांच्यासाठी केलेली सर्व कामे अप्रतिम, अद्वितिय अशा स्वरूपाची असल्या कारणाने श्री. मनोहर नामदेव पाटील यांचे मन परिवर्तन झाले. पाटील यांनी काही कार्यकर्त्यांना सोबत घेवून “भारत राष्ट्रसमिती” अध्यक्ष के. चंद्रशेखर राव यांना भेटले आणि त्यांचे हस्ते पक्षात जाहीर प्रवेश केला.
यावेळी मिलिंद ढवळसकर, फारूक शेख, गोकुळ पाटील, शैलेश पाटील, व भुषण पाटील सोबत होते. यानंतर बोलताना श्री. मनोहर नामदेव पाटील बोलले की, येणाऱ्या काळात पिंपरी चिंचवड शहरात “भारत राष्ट्र समिती”ची ध्येय धोरणे राबवण्यात येतील व पक्षाला साजेसे काम करण्याची ग्वाही ही दिली.










