
भोसरी, दि. 27 (महाराष्ट्र मंथन) :- एम.आय.डी.सी भोसरी पोलीस स्टेशन कडील गहाळ झालेले एकुण ३० मोबाईलचा शोध घेवुन सॅमसंग, ओपे, विवो, वनप्लस, रेडमी रिअलमी असे एकुण ३,८५,०००/- रुपये किंमतीचे ३० मोबाईलचे व सोन्याचे दागिने तक्रारदार यांना एम. आय. डी. सी भोसरी पोलीस स्टेशन येथे समक्ष बोलावुन मा. विवेक पाटील पोलीस उप आयुक्त परिमंडळ – १ पिंपरी चिंचवड यांचे हस्ते गहाळ मोबाईल तसेच चोरीच्या दोन गुन्हयातील २० ग्रॅम वजनाचे १,००,०००/- रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने फिर्यादींना परत देण्यात आले आहेत.
सदरची कामगिरी मा.श्री. विनयकुमार चौबे पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड, मा. श्री. संजय शिंदे, सह. पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड, मा. श्री विवेक पाटील, पोलीस उपायुक्त, परिमंडळ-१, पिंपरी चिंचवड, श्रीमती प्रेरणा कट्टे सहा. पोलीस आयुक्त, पिंपरी विभाग, पिंपरी चिंचवड, राजेंद्र निकाळजे वरिष्ठ पोलीस निरीक्षक एम. आय. डी. सी भोसरी पोलीस स्टेशन यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार अनिल जोशी यांनी मोबाईलचे तांत्रिक विश्लेषण करून सचिन चव्हाण, पोलीस उप निरीक्षक पोलीस अंमलदार चंद्रकांत गवारी, स्वप्नील शेलार, संजय जरे, गणेश बोऱ्हाडे, राहुल लोखंडे, शरद गांधिले, भागवत शेप, नितीन खेसे, विशाल काळे, अनिकेत कांबळे, उषा होले एम. आय. डी. सी भोसरी पोलीस स्टेशन यांनी सदर उल्लेखनिय कामगीरी केली आहे.












Users Today : 7
Users Yesterday : 4
Users This Month : 200
Users This Year : 773
Total Users : 42541
Views Today : 14
Total views : 59576
Who's Online : 0