
भोसरी, दि. २९ (महाराष्ट्र मंथन) :- पिंपरी चिंचवड शहरात पुन्हा एकदा भटक्या कुत्र्याची दहशत पाहायला मिळत आहे. निद्रिस्त झालेल्या पिंपरी चिंचवड महानगपालिकेच्या बेजबाबदार कामकाजामुळे आज भोसरी भागातील लांडगे वस्ती येथे भटक्या कुत्र्याने दोन चिमुकल्या मुलावर जीवघेणा हल्ला केला आहे. या हल्ल्यात श्रीजित काकडे आणि गणेश गायकवाड हे दोन मुलं गंभीर जखमी झाले आहेत. काल संध्याकाळी ही मुल भोसरी परिसरात खेळत असताना त्यांच्यावर एका भटक्या कुत्र्याने जीवघेणा हल्ला केला. भटक्या कुत्र्याने श्रीजीत काकडे आणि गणेश गायकवाड या दोन मुलांच्या चेहऱ्याला चावा घेतला आहे. कुत्र्याच्या हल्ल्यात ही दोन्ही मुलं गंभीर जखमी झाली असून, या दुर्घटनेमुळे पिंपरी चिंचवड शहरात पुन्हा एकदा भटक्या कुत्र्यांचा दहशतीचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे.
वेळोवेळी लोक प्रशासनाला तक्रार देऊनही पालिका प्रशासन या भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यात असमर्थ ठरत आहे. या गंभीर विषयाला बगल देणे सुरू आहे. आता तरी हे प्रशासन जागे होणार आहे काय? की पुन्हा झोपेचे सोंग घेऊन सुस्तावलेल्या अजगराप्रमाणे पडून राहणार आहे, असा प्रश्न जनमानसात विचारला जातोय. या जखमी बालकांविषयी हळहळ ही व्यक्त केली जातेय.












Users Today : 7
Users Yesterday : 4
Users This Month : 200
Users This Year : 773
Total Users : 42541
Views Today : 14
Total views : 59576
Who's Online : 0