तेलंगाणा, दि. 31 (महाराष्ट्र मंथन) :- हैद्राबाद महापालिकेच्या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान भाजपचे तेलंगाणा अध्यक्ष बंदी संजय यांनी आम्ही जिंकल्यास ओल्ड सिटीवर सर्जिकल स्ट्राईक करू, असे विधान केल्यानंतर या विधानामुळे भडकलेल्या एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी भाजपसह केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही टीका केली. ते म्हणाले, लुंगी उचलून घाबरवताय का आम्हाला? तोंडाला येईल ते बोलताय. ओल्ड सिटीवर सर्जिकल स्ट्राईक करणार म्हणताय, तुमच्या बापाची जागीर आहे का? या बघू या काय होतंय ते. आम्ही काय बांगडया घालून बसलोय काय? आमच्या आया बहिणी बांगडया घालून बसल्या तसल्या तरी त्याच पुरेशा आहेत तुमच्यासाठी. अबे जाउन चीनवर कर सर्जिकल स्ट्राईक. दम असेल तर बोल मोदींना की चीनला उखडून टाक, अशा शब्दांत बंदी संजय यांना सडेसतोड उत्तर दिले.










