पुणे, दि. 3 (महाराष्ट्र मंथन) :- युनिट – ५, गुन्हे शाखेकडील स्टाफ कोंढवा पोलीस स्टेशनचे हद्दीत पेट्रोलींग करीत असताना एक इसम हा ज्योती हॉटेल चौक, कोंढवा, पुणे येथे संशयीतरित्या वावरत असल्याने त्यास ताब्यात घेतले. त्याचे नाव पत्ता विचारता त्याने त्याचे नांव- विनायक मनोज बनकर, वय २१ वर्षे, रा. सरगम चाळ, गिरणी जवळ, अप्पर डेपो समोर, अप्पर इंदिरानगर, पुणे असे असल्याचे सांगीतले. त्यांची अंगझडती घेता त्याचे जवळ ९०,०००/- रु कि.चे मोबाईल फोन मिळाले. त्याने सदरचे मोबाईल फोन हे चोरीचे असल्याचे सांगीतले. त्याचेकडुन ०६ मोबाईल फोन व गुन्हा करणेसाठी वापरेलेली ४५,०००/- रु किंची मोटर सायकल जप्त करणेत आलेली आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.
यातील आरोपी विनायक बनकर यास दारु पिण्याचे व्यसन असुन त्या व्यसनापायी तो व त्याचा विधीसंघर्षित साथीदार हे रस्त्याने जाणारे इसमांचे मोबाईल फोन जबरदस्तीने हिसकाऊन घेत असल्याचे निष्पन्न झालेले आहे. ताब्यातील आरोपी याचेकडुन खालील प्रमाणे गुन्हे उघडकीस आलेले आहेत
. भारती विद्यापीठ पो .स्टे.गु.र .नं.३३८/२०२३ भा.द.वि.कलम ३९२,३४
. कोंढवा पो .स्टे.गु.र .नं .५५७/२०२३ भा.द.वि .क.३९२,३४.
. कोंढवा पो .स्टे.गु.र .नं .५४०/२०२३ भा.द.वि.क.३९२,३४
. हडपसर पो.स्टे.गु.र .नं.८१९/२०२३ भा.द.वि.क.३७९
- हडपसर पो.स्टे.गु.र .नं.८१८/२०२३ भा.द.वि.क ३७९
हे गुन्हे उघडकीस आलेले असुन एक मोबाईल फोन हा आरोपीने एका इसमाचे डोळ्यात स्प्रे मारुन जबरदस्तीने चोरलेला असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्याबाबत पुढील कारवाई करीत आहोत.
सदरची कारवाई ही मा.पोलीस आयुक्त,पुणे शहर,श्री.रितेश कुमार, मा.पोलीस सह आयुक्त, श्री.संदीप कर्णिक, मा. अपर पोलीस आयुक्त, गुन्हे श्री.रामनाथ पोकळे, मा.पोलीस उप आयुक्त, मा. सहायक पोलीस गोवेकर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक, उल्हास कदम, सहायक पोलीस निरीक्षक, कृष्णा बाबर, पोलीस उप निरीक्षक, चैताली गपाट, पोलीस अमंलदार, रमेश साबळे, प्रमोद टिळेकर, शशिकांत नाळे, पृथ्वीराज पांडुळे, विलास खंदारे, राहुल ढमढेरे यांनी केलेली आहे.












Users Today : 2
Users Yesterday : 7
Users This Month : 74
Users This Year : 474
Total Users : 42242
Views Today : 2
Total views : 58522
Who's Online : 0