“बाबासाहेबांचा” अनुयायी असणं एव्हढाच ‘‘अक्षय’’चा गुन्हा…?

पिंपरी, दि. 4 (महाराष्ट्र मंथन) :- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरा केली म्हणून नांदेड या ठिकाणी आंबेडकरी कार्यकर्ते ‘‘अक्षय भालेराव’’ यांचा निर्घृण खून केला. तरी आमची मा. मुख्यमंत्री आणि मा. गृहमंत्री यांना विनंती आहे. या सर्व घटनांवर आपला अंकुश असावा व आपण जातीने यात लक्ष घालावे. या घटनांचा निषेध करण्यासाठी समविचारी पक्ष संघटनेच्या वतीने दिनांक ०६ जून २०२३ रोजी विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक “भिमसृष्टी” समोर पिंपरी या ठिकाणी निषेध आंदोलन घेण्यात येणार आहे. तरी सर्व सामाजिक संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. असे बैठकीमध्ये आंबेडकरवादी चळवळ पिंपरी चिंचवड शहराच्या वतीने आवाहन करण्यात आले.
आंबेडकरवादी चळवळ पिंपरी चिंचवड शहर यांच्या वतीने दिनांक ०३ जून २०२३ रोजी पिंपरी येथील विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक भिमसृष्टी या ठिकाणी सर्व सामाजिक पक्ष संघटनेच्या वतीने बैठक आयोजित करण्यात आली होती.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरा केली म्हणून नांदेड या ठिकाणी आंबेडकरी कार्यकर्ते ‘‘अक्षय भालेराव’’ यांचा निर्घृण खून केला. तरी आमची मा. मुख्यमंत्री आणि मा. गृहमंत्री यांना विनंती आहे. या सर्व घटनांवर आपला अंकुश असावा व आपण जातीने यात लक्ष घालावे. या घटनांचा निषेध करण्यासाठी समविचारी पक्ष संघटनेच्या वतीने दिनांक ०६ जून २०२३ रोजी विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक “भिमसृष्टी” समोर पिंपरी या ठिकाणी निषेध आंदोलन घेण्यात येणार आहे. तरी सर्व सामाजिक संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. असे बैठकी मध्ये आंबेडकरवादी चळवळ पिंपरी चिंचवड शहराच्या वतीने आवाहन करण्यात आले.
या वेळी धुराजी शिंदे, देवेंद्र तायडे, राजन नायर, अंकुश कानडी, चंद्रकांत लोंढे, शिवशंकर उबाळे, गोपाल मोरे, अरूण मैराळे, रामभाऊ ठोके, प्रविण कांबळे, मुकुंद रणदिवे, सुनिल गायकवाड व असंख्य सामाजिक राजकीय संघटनेचे नेते व कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Comment

READ MORE