निगडी, दि. 14 (महाराष्ट्र मंथन) :- सेक्टर नंबर 22 मधील यमुनानगर रूग्णालयामधील प्रसुतीगृह हे नागरिकांच्या आणि विशेषतः स्त्रियांच्या अत्यंत जिव्हाळयाची आणि गरजेची अशी जागा आहे. येथे प्रसुतीसाठी येणा-या प्रत्येक स्त्रीच्या सुरक्षेची काळजी घेणे हे रूग्णालय प्रशासनाचे काम आहे. परंतु याच रूग्णालयातील सुरक्षा विभागाच्या अत्यंत बेजबाबदार आणि निष्काळजीपूर्वक कामामुळे “यमुनानगर रूग्णालयातील प्रसुतीगृहाची सुरक्षा रामभरोसे”च असल्याचे बोलले जात आहे.
नागरिकांच्या आणि विशेषतः स्त्रियांच्या तक्रारी आल्यानंतर आमच्या प्रतिनिधींने दिनांक 12/6/2023 रोजी रात्री 10.30 वाजता रूग्णालयास भेट दिली असता असे आढळून आले की, एक पुरूष नातेवाईक आणि तोही मद्यपान केलेल्या अवस्थेत प्रसुतीगृहात प्रवेश करीत होता. तेथील उपस्थित सुरक्षा रक्षकांना जाण्ीव करून दिली असता की हे प्रसुतीगृह आहे भेटण्याची वेळ रात्री 8.30 वाजता संपलेली असताना 10.30 च्या सुमारास या पुरूषाला तुम्ही कसे प्रवेश करू देता. यावर त्यांचे म्हणणे होते की नागरिक ऐकत नाही अंगावर येतात. यावर त्यांना आमच्या प्रतिनिधीने सांगितले की आपण पोलीस मदत का घेत नाही? यावर त्यांनी अंग काढण्यावाचून काही उत्तर दिले नाही. अशा प्रकारे जर सुरक्षा व्यवस्थापन असेल तर या रूग्णालयातील स्त्री रूग्णांची आणि त्यांच्या अब्रूची सुरक्षा कशी राखता येईल. सुरक्षा रक्षकांना ज्या कठोर त-हेने वागावयास हवे होते ते अत्यंत मेंगळट आणि अंगकाढूपणाचे दिसून आले. तरी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त श्री. शेखर सिंग यांनी याबाबत कठोर पावले उचलून रूग्णालयातील सुरक्षा व्यवस्थापना सुधारण्याविषयी आणि दोषींवर कारवाई करण्याचे संबंधितांना आदेश द्यावेत, अशी मागणी यावेळी नागरिकांमधून करण्यात येत असल्याचे दिसून आले.
सुरक्षा रक्षक कमी असल्याने आम्ही अधिक सुरक्षा रक्षकांची मागणी केली आहे – मुख्य निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. नासिर
याबाबत आमचे प्रतिनिधींनी रूग्णालयाचे मुख्य निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. नासिर यांना याविषयी विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, आम्ही सुरक्षा रक्षकांना खबरदारी घेण्यास सांगितले आहे आणि प्रकरण जास्तच वाढल्यास पोलिसांची मदत घेण्याविषयी सांगितले आहे. तसेच रूग्णालयात सुरक्षा रक्षकांची कमतरता असून आम्ही वरिष्ठांकडे अधिक सुरक्षा रक्षकांची मागणी केली आहे.












Users Today : 7
Users Yesterday : 4
Users This Month : 200
Users This Year : 773
Total Users : 42541
Views Today : 11
Total views : 59573
Who's Online : 0