निगडी, दि. 1 (महाराष्ट्र मंथन):- ‘‘यमुनानगर रूग्णालयाच्या प्रवेशद्वाराला उकिरडयाचे स्वरूप’’ या मथळयाखाली दिनांक 30 जून रोजी आमच्या महाराष्ट्र मंथन वृत्तवाहिनीवर बातमी प्रसिद्ध केली होती. त्याचा परिणाम म्हणून प्रशासनाने केवळ 24 तासांच्या आत सर्व यंत्रणा घेवून सदर जागेतील संपूर्ण कचरा स्वच्छ केला आणि तेथाील पडून असलेला सिमेंट पाईपही हटविण्यात आला. या वृत्ताबद्दल परिसरातील नागरिकांनी महाराष्ट्र मंथनचे आभार मानले. सदर कारवाई आरोग्य विभागाचे शांताराम माने, ठेकेदार श्री. बबन आणि त्यांच्या टीमने सदर कारवाई केली त्यांचेही परिसातील नागरिकांनी आभार व्यक्त केले.

Author: Maharashtra Manthan
Post Views: 104










