पिंपरी, दि. 24 (महाराष्ट्र मंथन):- लोकमान्य टिळक आंतरराष्ट्रीय पुरस्कार सोहळा निमित्ताने पुढील आठवडयात पंतप्रधान नरेंद्र मोदी पुणे दौऱ्यावर उपस्थित राहणार असून पिंपरी चिंचवड शहरातील रेड झोन प्रश्न सोडविण्यात यावा म्हणून सामाजिक कार्यकर्ते सचिन काळभोर यांनी मागणी केली आहे. त्या संदर्भात चंद्रकांतदादा पाटील ह्यांना लेखी पत्राद्वारे मागणी करण्यात आली असून पिंपरी चिंचवड शहरातील रेड झोन प्रश्न सोडविण्यात यावा यासाठी साकडे घालण्यात आला आहे.
संरक्षण क्षेत्रातील बाधित जागा क्षेत्र कमी करण्यात यावे तसेच पुणे जिल्हाधिकारी साहेब ह्यांनी सन २०२२ मध्ये पिंपरी चिंचवड शहरातील रेड झोन संरक्षण क्षेत्रातील बाधित जागा क्षेत्र म्हणून नवीन नकाशा प्रसिद्ध केला असून त्या संदर्भात पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील ह्यांनी ताबडतोब दखल घेऊन संबंधित रेड झोन प्रश्न सोडविण्यात यावा म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब ह्यांना लेखी पत्राद्वारे मागणी करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली.
पिंपरी चिंचवड शहरातील रेड झोन संरक्षण क्षेत्रातील बाधित गावे मोशी चिखली दिघी बोपखेल भोसरी कासारवाडी रावेत दापोडी फुगेवाडी निगडी किवळे पिंपरी तळवडे येथील गावे संरक्षण क्षेत्रातील बाधित जागा क्षेत्र म्हणून पुणे जिल्हाधिकारी साहेब ह्यांनी जाहीर केली. त्या संदर्भात पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील साहेब ह्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब पुणे दौऱ्यावर दिनांक १/८/२०२३ रोजी येत असून पिंपरी चिंचवड शहरातील रेड झोन प्रश्न सोडविण्यात यावा यासाठी साकडे घालण्यात आले.
निगडी येथील सेक्टर २२ हया ठिकाणी पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासन अंतर्गत जवाहरलाल नेहरू पुनर्वसन योजना अंतर्गत ९ इमारत बांधकाम संपूर्ण होऊन १२/१३ वर्ष झाली असूनसुद्धा पिंपरी चिंचवड शहरातील निगडी येथील सेक्टर २२ मधील जवाहरलाल नेहरू पुनर्वसन योजना अंतर्गत घरकुल पात्र लाभार्थी यांना आजपर्यंत देण्यात आले नसून त्या संदर्भात स्थायी समिती माजी नगरसेविका सीमाताई साळवे ह्यांनी रेड झोन परिसरात पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासन ह्यांनी जवाहरलाल नेहरू पुनर्वसन योजना अंतर्गत घरकुल इमारत बांधकाम केले म्हणून मुंबई उच्च न्यायालयात स्थगिती आदेश आणला होता. त्यामुळे पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासन ह्यांनी जवाहरलाल नेहरू पुनर्वसन योजना अंतर्गत घरकुल नागरिकांना आजपर्यंत देण्यात आले नसून पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासन ह्यांनी सेक्टर २२ येथील जवाहरलाल नेहरू पुनर्वसन योजना अंतर्गत घरकुल संदभात मुंबई उच्च न्यायालयात स्थगिती आदेश रद्द करण्यासाठी उपाययोजना केल्या नाहीत तसेच आजपर्यंत पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासन ह्यांनी रेड झोन संरक्षण क्षेत्रातील बाधित जागेमध्ये बांधकाम परवाना देण्यात येत नाही.
नागरिकांना विनाकारण त्रास सहन करावा लागत आहे तर दुसरीकडे रेड झोन संरक्षण क्षेत्रातील बाधित जागेमध्ये बांधकाम केले म्हणून बँक लोन होत नाही तसेच इतर नागरी सुविधा उपलब्ध होण्यासाठी नागरिकांना पायपीट करावी लागत आहे त्या संदर्भात पुणे जिल्हा पालकमंत्री चंदकांत दादा पाटील ह्यांना पिंपरी चिंचवड शहरातील रेड झोन प्रश्न सोडविण्यात यावा म्हणून मागणी करण्यात आली असून पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब पुणे दौऱ्यावर येत असून पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब ह्यांच्या सोबत चर्चा करून पिंपरी चिंचवड शहरातील रेड झोन प्रश्न ताबडतोब सोडविण्यासाठी मागणी सामाजिक कार्यकर्ते पिंपरी चिंचवड शहर यांनी केली आहे.












Users Today : 7
Users Yesterday : 4
Users This Month : 200
Users This Year : 773
Total Users : 42541
Views Today : 14
Total views : 59576
Who's Online : 0