पिंपरी, दि. 7 (महाराष्ट्र मंथन):- पहिल्या महिला मेट्रो चालकाचा मान मिळविणा-या अपूर्वा अलाटकर हिचा सन्मान राष्ट्रवादी युवती कॉंग्रेस पिंपरी चिंचवडतर्फे करण्यात आला. अत्यंत वेगाने विस्तारणाऱ्या पुणे व पिंपरी चिंचवड शहरात मेट्रोची सुरुवात 2 ऑगस्ट रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या शुभहस्ते करण्यात आली. ह्यावेळी आपल्यातील कौशल्य दाखवण्याची संधी सातारा जिल्ह्यातील अपूर्वा प्रमोद अलाटकर ह्या युवतीला मिळाली. #मेट्रो ची मास्क ऑन की च्या साथीने लोको पायलट अपूर्वा हिने सर्व तांत्रिक बाबीच्या मदतीने वनाज येथून उद्घाटनाची फेरी पूर्ण केली.
मॅकॅनिकल इंजिनिअर झाल्यानंतर रीतसर परीक्षेच्या 3 फेऱ्या पूर्ण करत प्रशिक्षण घेतल्यानंतर तीने मेट्रो चालविण्यास सुरुवात केली. आपल्यातील मध्यमवर्गीय कुटुंबातील युवतीने आज अनेकांना पुन्हा एकदा आकाशाला गवसणी घालण्याचे नव्याने स्वप्न दाखविले म्हणून त्याचा सार्थ अभिमान बाळगत राष्ट्रवादी युवती संघटना पिंपरी चिंचवड शहराच्या वतीने यांच्या पुढाकाराने अपूर्वाचा सन्मान आणि सत्कार डेक्कन या स्टेशन वर जाऊन केला.
ह्यावेळी युवती अध्यक्षा वर्षा जगताप, शुभदा पवार, मेहेक इनामदार, मयुरी सोळसे, मेघना जगताप, स्नेहल मंचेकर, चैत्राली आढाव, वैष्णवी जगताप या युवती उपस्थित होत्या.










