रूपीनगर, दि. 19 (महाराष्ट्र मंथन):- येथील महानगरपालिकेची मौलाना अबुल कलाम आझाद उर्दू प्राथमिक शाळेतील मुलांना पालिकेच्या ठेकेदारामार्फत बिस्किट वाटप न करण्यात आल्याने या वंचित विद्यार्थ्यांना आपल्या खर्चातून बिस्किटच्या पुडयांचे वाटप मिनारा मस्जिद रूपीनगर या मशिदीच्या ट्रस्टच्या वतीने करण्यात येवून अशा प्रकारे त्यांनी या लहान मुलांसह भारताचा 75 वा स्वातंत्र्यदिन साजरा केला.
मौलाना हबीबउल्ला खान यांच्या हस्ते ध्वजवंदन घेण्यात आले. याप्रसंगी रुपीनगर येथील सामाजिक कार्यकर्ते अरुण थोपटे, के. डी. वाघमारे, काशिनाथ वाडेकर, प्रवीण जानकर, गणेश भिंगारे तसेच मशिदीचे विश्वस्त हनीफ मुल्ला मेहबूब शेख, अल्ताफ मुजावर, जमीर मुल्ला, मकबूल शेख, जुबेर काजी, फैयाज शेख, जावेद पठाण, जाकीर शेख उपस्थित होते.
कार्यक्रमाचे नियोजन नूर शेख, आरिफ शेख, समीर मुल्ला, मजहर शेख, इम्रान शेख, मोहसीन शेख, समीर शेख यांनी केले. तसेच रुपीनगर येथील मौलाना अबुल कलाम आझाद उर्दू प्राथमिक शाळेत स्वातंत्र्यदिनानिमित्त प्रमुख पाहुणे म्हणून मीनारा मस्जिदचे विश्वस्त जमीर मुल्ला, हनीफ मुल्ला, सना बेकरीचे मालक फैयाज शेख जुबेर काजी उपस्थित होते त्यावेळेस उर्दू प्राथमिक शाळेत पालिकेच्यावतीने स्वातंत्र्य दिनानिमित्त उपलब्ध होणारा खाऊ वेळेवर उपलब्ध झाला नव्हता. ही बाब लक्षात येताच त्वरित जाऊन जमीर मुल्ला, हनीफ मुल्ला, जुबेर काजी, फैयाज शेख यांनी शाळेला खाऊ उपलब्ध करून दिला.












Users Today : 7
Users Yesterday : 4
Users This Month : 200
Users This Year : 773
Total Users : 42541
Views Today : 13
Total views : 59575
Who's Online : 0