पिंपरी, दि. १८ (महाराष्ट्र मंथन):- संपूर्ण भारत देशाला विळखा टाकलेल्या हृदयरोगाचा नायनाट करण्याचा प्रण माधवबागतर्फे घेण्यात आला. माधवबाग पिंपरी मोरवाडी आयोजित “हार्दिक” या सुंदर उपक्रमाची सांगता झाली. कार्यक्रमाचे प्रमुख उपस्थिती तुषार हिंगे तेजस हिंगे डॉ. सुहास डावखर (पेशंट एंगेजमेंट हेड) माधवबाग आणि मा. श्रीचंद होतवाणी आरआयसी हेड पुणे माधवबाग हे होते धन्वंतरी पूजेनंतर कार्यक्रमाची सुरूवात झाली. या कार्यक्रमामध्ये पिंपरी मोरवाडी येथे उपचार घेवून पूर्ण बरे झालेल्या रुग्णांचा (रिव्हर्सल हीरो) म्हणून सत्कार झाला. एकूण ४० रुग्णांचा सत्कार ही माधवबागसाठी अभिमानास्पद बाब आहे, असे डॉ. शीतल मोरे - म्हैसने यांनी संगितले. या कार्यक्रमावेळी अनेक रुग्णांनी आपल्या आजारावरील मात केल्याचे अनुभव संगितले. पिंपरी चिंचवड वाहतूक पोलिस खात्याचे पोलिस निरीक्षक यांनीही त्यांना भेडसावत असलेल्या रक्तदाबाविषयी आणि माधवबागमध्ये आल्यानंतर कशाप्रकारे त्यांचा असाध्य असा रक्तदाब आटोक्यात आला याविषयी त्यांनी संगितले. त्यांनी संगितले की आजच्या ५० पार केलेल्या कोणत्याही व्यक्तीने आपल्या छोट्या छोट्या त्रासलाही दुर्लक्ष न करता त्वरित डॉक्टर यांच्याशी संपर्क साधावा. यावेळी स्नेहल सुकते यांनी संगितले की, त्यांचे वडील सुरेश सुकते हे कोविडमध्ये घेतलेल्या गोळ्यांमुळे त्यांना डायबेटीस झाल्यामुळे त्यांना किडनीचासुद्धा त्रास सुरू झाल्यानंतर त्यांनी त्यांच्या वडिलांना घेऊन मोरवाडी माधवबाग येथे उपचार घेतले आणि महिन्याभरचा व्यायाम घेतल्याने त्यांना आज सर्व त्रास दूर झाला आहे. स्नेहल यांनी माधवबागच्या मुख्य डॉ. शीतल मोरे मॅडम यांचे खूप खूप आभार मानले. या कार्यक्रमाद्वारे हृदयाचे स्पंदन, आरोग्यदर्शन, निरोगी हृदय निरोगी जीवन हा नारा देण्यात आला. आजारातून बाहेर पाडलेल्या सर्व रुग्णांचे यावेळी प्रशस्तिपत्रक देवून कौतुक करून सत्कार करण्यात आले
प्रत्येक घरामध्ये एक तरी रुग्ण असा असतो की हृदयविकार किडनी शुगर अशा प्रकारचे रुग्ण घरांमध्ये असतात यांना गोळ्या मुक्त करण्यासाठी पिंपरी चिंचवड शहरामध्ये एक अभियान माधव बाग यांनी आयोजन केल आहे. याचा प्रत्यक्षात घेण्यासाठी माधव बाग येथे भेट शरीरातील आजार आहारापासून रोग मुक्त शकतो शरीरात साखर वाढल्यावर रक्त घट्ट रक्त होण्याची भीती असते डोळे किडनी हृदय यांना देखिल त्रास होऊ शकतो त्यामुळे आपण डॉक्टरांचा सल्ला घेऊन योग्य आहार उपचार घेऊन आजार मुक्त होऊ शकतो असे यावेळी डॉक्टर शितल मोरे यांनी सांगितले. त्या रुग्णाची एक मार्गदर्शन शिबिराच्या आयोजन करण्यात आले. गोळी मुक्त झालेल्या रुग्णाचा सन्मान करण्यात आला यावेळी त्या बोलत होत्या.












Users Today : 2
Users Yesterday : 3
Users This Month : 206
Users This Year : 779
Total Users : 42547
Views Today : 7
Total views : 59602
Who's Online : 0