पिंपरी, दि. १३ (महाराष्ट्र मंथन):- ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांच्यावर जीवघेणा हल्ला करणाऱ्या सर्व गुन्हेगारांचा शोध घेऊन त्यांना कडक शासन करावे, अशी मागणी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पिंपरी चिंचवड शहरातील पत्रकारांनी केली आहे. पिंपरी चिंचवड महापालिका पत्रकार कक्षामध्ये पिंपरी चिंचवड शहर पत्रकार संघाच्यावतीने निषेध सभेचे आयोजन करण्यात आले.
ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे, ज्येष्ठ समाजसेवक विश्वंभर चौधरी आणि प्रसिद्ध वकील असीम सरोदे यांच्यावर मागील शुक्रवारी पुण्यात “निर्भय बनो” कार्यक्रमाला जात असताना जीवघेणा हल्ला करण्यात आला. या कृत्याचा निषेध करण्यासाठी काल पिंपरी महापालिका पत्रकार कक्षामध्ये निषेध सभा घेण्यात आली. यावेळी पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते. संस्थापक अध्यक्ष बापूसाहेब गोरे, माजी अध्यक्षा सायली कुलकर्णी, अध्यक्ष दादाराव आढाव, भीमराव तुरुकमारे, महाराष्ट्र मंथनचे मुख्य संपादक श्री. शफिक शेख, युनूस खतीब, गणेश शिंदे, यशवंत गायकवाड, श्रीधर जगताप इत्यादींनी निखिल वागळे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा कडाडून निषेध केला.
आज राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लेखी स्वरूपात निषेध पत्र पाठविण्यात येणार असल्याचे बैठकीत एकमताने ठरविण्यात आले. यावेळी बाबू कांबळे, मुकुंद कदम, लक्ष्मण रोकडे, संतोष जराड, मुकेश जाधव इत्यादी पत्रकार उपस्थित होते.












Users Today : 5
Users Yesterday : 4
Users This Month : 198
Users This Year : 771
Total Users : 42539
Views Today : 6
Total views : 59568
Who's Online : 0