निगडी, दि. २८ (प्रतिनिधी) :- पवित्र रमजान महिन्याचे रोजा इफ्तार करून घरी परतणाऱ्या अली आदम शेख या तरुणावर ओटा स्कीम येथील फातिमा मशीद गेटजवळ काही इसमांनी प्रथम लाथा बुक्क्यांनी आणि त्यानंतर पाठीवर कोयत्याने वार करून गंभीर जखमी केले. या घटनेमुळे येथील मुस्लिम समाजात प्रचंड रागाचे आणि हळहळीचे वातावरण निर्माण झाले आहे. निगडी पोलिसांनी गुन्हा क्रमांक १३०/२०२४ द्वारे भा. द. वि. कलम ३२४, ५०४, ५०६, १४३, १४७, १४८, १४९, ३४, आर्म अॅक्ट ४ (२५), मुंबई पोलीस कायदा कलम ३७ (१) (३) सह १३५ प्रमाणे गुन्हा नोंद केला आहे.
साहील मुकरताल, अफताफ शेख, फैयाज शेख, साहील शेख व ५) कासीम शेख सर्व रा. ओटास्किम निगडी अशी आरोपींची नावे असून अद्याप एकालाही अटक करण्यात आलेले नाही.
याबाबत संपूर्ण माहिती अशी की दि.२६/०३/२०२४ रोजी सायंकाळी ७.३० वा चे सुमारास फातीमा मस्जीत गेटजवळ, ओटास्कीम निगडी पुणे येथे अली आदम शेख वय २१ वर्ष, धंदा व्यवसाय, रा. प्लॅट नं २१, आशिर्वाद बील्डींग, अंकुश चौकाजवळ, ओटास्किम, निगडी, पुणे. हे रोजा उपवास सुरु असलेने उपवास सोडुन पवळे शाळेजवळ त्याचा मित्र नामे इरफान शेख यास भेटण्यासाठी त्याच्या अॅक्टीव्हा गाडी क्र. एम. एच. १४ जे.ई. १४०४ हीचेवरुन जात असताना फातीमा मस्जीद गेटजवळ, ओटास्कीम निगडी पुणे येथे आरोपी क्र. १ याने समोरुन येवुन फिर्यादी याची गाडी थांबवुन विनाकारण शिवीगाळ करुन तुला जास्त माज आलाय अशी धमकी देवुन हाताने मारहाण करण्यास सुरवात केली. त्यानंतर त्याने फिर्यादीला जवळच असलेल्या त्यांचे अंजुमन सोसायटी, येथे मारत मारत नेले त्याठिकाणी असलेल्या अफताफ शेख, फैयाज शेख, साहील शेख व कासीम शेख यांनी सर्वांनी मिळुन फिर्यादीला खाली वाकवुन लाथा बुक्यांनी मारहाण केली. त्यावेळी साहील मुकरताल याने त्याचे हातातील कोयत्याने फिर्यादीचे पाठीवर मारुन जखमी केले आहे, असे पोलिसांनी त्यांच्या प्रथम खबरी अहवालात (FIR) मध्ये नमूद केले आहे. पुढील तपास पोलीस हवालदार श्री. नागरगोजे हे करीत आहेत.












Users Today : 2
Users Yesterday : 7
Users This Month : 74
Users This Year : 474
Total Users : 42242
Views Today : 2
Total views : 58522
Who's Online : 0
1 thought on “रोजा इफ्तारी करून परतणाऱ्या तरुणावर ओटा स्कीम येथे कोयत्याने प्राणघातक हल्ला”
Aise logo ko sakht saza milni chahiye…