वाकड, दि. ८ (महाराष्ट्र मंथन):- काळाखडक येथे विकसकाने काही स्थानिक लोकांना हाताशी धरून “अपना वतन” संघटनेची बदनामी करण्याच्या उद्देशाने “जोडे मारो” आंदोलन घडवून आणले. त्यामुळे आम्ही काळाखडकमधील सर्व नागरिक “अपना वतन” संघटनेच्या सोबत आहोत हे सांगण्यासाठी व तथ्यहीन आरोप करून “अपना वतन” संघटनेला बदनाम करणाऱ्या विकसक व विरोधक यांचेवर कायदेशीर कारवाई करण्याच्या मागणीसाठी रविवार दिनांक ७/०४/२०२४ सकाळी ११ वाजता अपना वतन संघटनेचे अध्यक्ष सिद्दीकभाई शेख यांच्या समर्थनार्थ काळाखडक येथील शेकडो नागरिकांनी एकत्र येत “स्वाभिमान” आंदोलन केले. यावेळी सिद्दिकभाई शेख यांच्या प्रतिमेला दूध अर्पण करून दुग्धाभिषेक करण्यात आला. यावेळी अनेक महिला व नागरिक उपस्थित होते. यावेळी नागरिकांनी सिद्दीकभाई आगे बढो, हम तुम्हारे साथ है, हमारा नेता कैसा हो, सिद्दीकभाई जैसा हो, आम्ही सिद्दीकभाई सोबत, आम्ही सच्चाई सोबत, अशा घोषणा देऊन नागरिकांनी परिसर दणाणून सोडला.
यावेळी नागरिकांनी “अपना वतन” संघटनेला बदनाम करणाऱ्या विकसक व विरोधक यांचेवर कायदेशीर कारवाई करण्याच्या मागणीचे निवेदन पोलीस आयुक्त पिंपरी चिचंवड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, वाकड पोलीस स्टेशन यांना दिलेले आहे. आंदोलनावेळी नागरिकांनी सांगितले कि, विकसक आर्थिक आमिष देऊन काही स्थानिक कार्यकर्त्यांना व गुंडाना हाताशी धरून नागरिकांचा विरोध असताना जोर जबरदस्तीने प्रकल्प राबवण्याचा प्रयत्न करीत आहे. तसेच झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाकडून झोपडपट्टी अधिनियम मधील तरतुदीनुसार अटी व शर्तींचे उल्लंघन करून, बेकायदेशीरपणे प्रकल्प राबवत असल्याने काळाखडक झोपडपट्टी धारकांचा एसआरए प्रकल्पाला तीव्र विरोध आहे. याबाबत नागरिकांनी स्थानिक कार्यकर्ते व नेते यांच्याकडे मदतीसाठी हात पसरले परंतु सगळ्यांनी हात वर केले. एसआरएचे मुख्य अधिकारी यांनी सांगितल्याप्रमाणे सण २०१२ च्या प्रस्तावाच्या आधारे प्रकल्प राबविल्यास काळाखडक पुनर्वसन प्रकल्पात बोगस व बनावट कारभारामुळे शेकडो नागरिक बेघर होण्याची भीती निर्माण झालेली आहे. त्यामुळे आम्हाला कोणी वाली राहिलेला नसल्याने अपना वतन संघटनेचे अध्यक्ष सिद्दीकभाई शेख यांचेकडे काळाखडक येथील स्थानिक नागरिकांनी दिनांक १४ मार्च २०२४ रोजी ५०० स्वाक्षऱ्या असलेले निवेदन दिलेले आहे. त्यानुसारच अपना वतन संघटनेने काळा खडक येथील नागरिकांसाठी कायदेशीर आंदोलन केलेले आहे. संघटनेने आमच्या मागण्या रीतसर पद्धतीने झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण यांचेकडे निवेदनाद्वारे पोहचवलेल्या आहेत. परंतु विकसकाने काही जणांना समोर करून व्यक्तीगत टीका करून बदनामीचा प्रयत्न केला आहे.
दरम्यान विकसकाने काही स्थानिक कार्यकर्त्यांना हाताशी धरून “अपना वतन” संघटनेच्या कार्यकर्त्यांना बदनाम करण्यासाठी “जोडे मारो” आंदोलन केले होते. या आंदोलनाच्या माध्यमातून बिनबुडाचे, तथ्यहीन आरोप करून सिद्दीक शेख यांना बदनाम करण्याचा घाट विकसक व काही लाचार लोकांनी केलेला आहे. त्यामुळे आम्ही काळाखडकमधील सर्व नागरिक अपना वतन संघटनेच्या सोबत आहोत. यावेळी काळाखडक येथील विकास पंडागळे, प्रदीप जाधव, रवी दांडे, श्रीकांत विटकर, विजय जाधव, नयूम पठाण, कयूम पठाण, किरण जाधव, निखिल चौगुले, सोमनाथ देवकर, विमल पवार, मीना मंजुळकर, संगीता काळे, बानू शेख यांसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अपना वतन हि कायदेशीर काम करणारी संघटना म्हणून संपूर्ण शहराला परिचित आहे. एस आर ए योजनेच्या नियमावली नुसार काळाखडक येथील शेकडो नागरिक अपात्र होणार आहेत. वर्षानुवर्षे राहणारे नागरिक बेघर होणार असल्याने स्थानिक नागरिकांनी संघटनेला लेखी पत्र दिल्यानुसार संघटनेने आमच्या मदतीसाठी आम्हाला प्रशासकीय व न्यायालयीन स्तरावर मदत करण्याचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे आम्ही स्थानिक अपना वतन संघटनेच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार आहोत, अशी प्रतिक्रिया येथील स्थानिक नागरिक विकास पंडागळे (९५२७७५५२१०)












Users Today : 0
Users Yesterday : 7
Users This Month : 72
Users This Year : 472
Total Users : 42240
Views Today :
Total views : 58520
Who's Online : 0