चिंचवड, दि. २६ (महाराष्ट्र मंथन):- प्रचंड महागाईच्या काळात घरातील कामकाज करून आपल्या पतीला आर्थिक हातभार लावण्यासाठी आज अनेक स्त्रिया पुढे सरसावत आहेत. अशाच दोन स्त्रिया या कायनेटिक कंपनीसमोर एमआयडीसी चिंचवड येथे भर उन्हात घरगुती बनविलेले थंड पेये विक्री करून आपल्या कुटुंबाला आर्थिक हातभार लावित आहेत. फ्रेश ज्यूस सेंटर असे त्यांचे ज्यूस सेंटरचे नाव असून अश्विनी जाधव आणि पल्लवी सोनार अशी या दोन्ही स्वयंसिद्धांची नावे आहेत. अत्यंत रुचकर आणि थंड आणि कोणतेही रसायन न वापरता वाजवी दरात या दोघी थंड पेयांची विक्री करीत आहे. आमच्या वाचकांना विनंती आहे की त्यांनी येथे जावून एक वेळेस जरून भेट द्यावी. त्याचप्रमाणे वाचकांना विनंती आहे की जर आपल्या घरी किंवा कंपनीमध्ये कार्यक्रमासाठी थंड पेयांची ऑर्डर असेल तर 8007473997 या क्रमांकावर संपर्क साधून सहकार्य करावे.












Users Today : 2
Users Yesterday : 3
Users This Month : 206
Users This Year : 779
Total Users : 42547
Views Today : 10
Total views : 59605
Who's Online : 0