चिखली, दि. २८ (महाराष्ट्र मंथन) :- दोन वर्षांकरिता पुणे जिल्ह्यातुन तडीपार आरोपीला तडीपारीचा आदेश भंग करून पिंपरी चिंचवडच्या हद्दीत प्रवेश आणि विनापरवाना दोन पिस्टल व चार काडतुस बाळगल्याप्रकरणी पिंपरी चिंचवड, गुन्हे शाखा युनिट १ ने मोठ्या शिताफीने अटक केले. गुन्हे शाखा युनिट १ या कामगिरीने संपूर्ण परीसातून त्यांचे कौतुक करण्यात येत आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, दि.२७/०४/२०२४ रोजी रेकॉर्डवरील तडीपार गुन्हेगार तुषार झेंडे हा साने चौक, भिसे वाईन समोरील मोकळया मैदानात, चिखली पुणे येथे येणार असुन त्याचे जवळ पिस्टल आहे, अशी माहिती मिळताच गुन्हे शाखा युनिट १ चे टिमने माहितीच्या ठिकाणी जावुन तुषार झेंडे हा साने चौक, भिसे वाईन समोरील मोकळया मैदानात कोणाची तरी वाट बघत थांबलेला दिसला पोलीसांची चाहुल लागल्याने तो पळुन जात असता त्याचा पाठलाग करून तडीपार आरोपी तुषार ऊर्फ तुसल्या गौतम झेंडे, वय २६ वर्षे रा. उरवेला हौ. सोसा. बि. नं. ०५, रुम नं.०८, ओटास्कीम, निगडी, पुणे यास मोठ्या शिताफीने पकडले. त्याची अंगझडती घेतली असता त्याचे जवळ दोन देशी बनावटीचे पिस्टल व चार जिवंत काडतुसासह मिळुन आले. त्याचे विरूध्द विनापरवाना बेकायदेशीररित्या शस्त्र जवळ बाळगले व तडीपार आदेशाचा भंग केल्याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक शिवाजी कानडे, गुन्हे शाखा युनिट १, पिंपरी चिंचवड हे करीत आहेत.
आरोपी तुषार ऊर्फ तुसल्या गौतम झेंडे हा निगडी व पिंपरी पोलीस स्टेशनचे रेकॉर्ड वरील गुन्हेगार असुन त्याचे विरूध्द खुन, दरोडा, जबरी चोरी असे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहे. त्यास पोलीस उप आयुक्त, परीमंडल -२ यांनी दि.२३/०८/२०२२ रोजी पासुन दोन वर्षा करीता पुणे जिल्ह्यातुन तडीपार केलेले आहे.
सदरची कारवाई पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उपआयुक्त संदिप डोईफोडे, सहा. पोलीस आयुक्त विशाल हिरे, सहा. पोलीस आयुक्त बाळासाहेब कोपनर यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट १ चे पोलीस निरीक्षक गोरख कुंभार, पोलीस उपनिरीक्षक शिवाजी कानडे, पोलीस अंमलदार सचिन मोरे, अमित खानविलकर, बाळु कोकाटे, फारूख मुल्ला, सोमनाथ बो-हाडे, महादेव जावळे, उमाकांत सरवदे, स्वप्निल महाले, अजित रुपनवर, विशाल भोईर, मारूती जायभाये, तानाजी पानसरे यांचे पथकाने केली आहे.












Users Today : 5
Users Yesterday : 4
Users This Month : 198
Users This Year : 771
Total Users : 42539
Views Today : 8
Total views : 59570
Who's Online : 0