चिंचवड, दि. ७ (महाराष्ट्र मंथन):- “पुणे-मुंबई महामार्गावरील ड्रेनेजचे तुटलेले जीवघेणे झाकण केंव्हा बसविणार?” या मथळ्याखाली पुणे मुंबई महामार्गावरील बॉम्बे सिलेक्शन जवळील तुटलेल्या आणि जीवघेण्या ड्रेनेजच्या झाकणाची बातमी महाराष्ट्र मंथन वृत्त वाहिनीने दिनांक ५ मे रोजी प्रसिद्ध केले होते. या गंभीर बाबीची दखल घेवून महानगरपालिकेने त्वरित नवीन झाकण न बसविल्यास त्याच ठिकाणी जोरदार आंदोलनाचा इशाराही नवयुग निर्माण समितीचे पिंपरी चिंचवड अध्यक्ष आणि सामाजिक कार्यकर्ते अब्दुल्ला शेख यांनी दिला होता.
सदर बाबीची दाखल तात्काळ आरोग्य विभागाकडून घेण्यात आली आणि केवळ ४८ तासांच्या आत सादर नादुरुस्त आणि जीवघेणे झाकण दुरुस्त करण्यात आले. या कार्यामुळे या परिसरातील नागरिक आणि येथून दररोज ये-जा करणार्या वाहनचालकांनी महाराष्ट्र मंथन वृत्तवाहिनीचे, श्री. अब्दुल्ला शेख यांचे आणि त्यांच्या नवयुग निर्माण समितीचेही आभार मानले.












Users Today : 1
Users Yesterday : 7
Users This Month : 73
Users This Year : 473
Total Users : 42241
Views Today : 1
Total views : 58521
Who's Online : 0