बारामती, दि. ७ (महाराष्ट्र मंथन):- बारामती लोकसभा मतदारसंघात आज मतदान पार पडत आहे. काटेवाडीतील मतदानानंतर सुप्रिया सुळे अजितदादांच्या घरी गेल्या. यावेळी अजितदादांच्या आईचे आशिर्वाद घेण्यासाठी गेल्याचे सुळे यांनी सांगितले. महत्वाचे म्हणजे यावेळी अजित पवार देखील घरी उपस्थित होते. त्यामुळे या भेटीमागे नेमकं काय दडलं आहे, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
आज बारामती मतदारसंघात मतदान पार पडत आहे. या लोकसभा मतदारसंघात अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार आणि शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे यांच्यात लढत आहे. हे दोन्ही गट प्रचारादरम्यान एकमेकांवर टीका करत होते.
आज सकाळी पवार कुटुंबातील सदस्यांनी विविध मतदान केंद्रावर आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. सर्व राजकीय धामधूम सुरू असताना सुप्रिया सुळे अचानक अजित पवार यांच्या घरी गेल्यामुळे राजकीय चर्चेला उधाण आलं आहे.
सुप्रिया सुळे यांनी ५ मिनिटे अजित पवार यांच्या आईची भेट घेतली. आशा काकी यांना नमस्कार करायला मी आले होते. आशाताई मतदान करायला आल्या होत्या. त्यामुळे त्यांना भेटले. मी नेहमीच आशिर्वाद घेण्यासाठी येत असते. हे माझ्या काका काकींचे घर आहे. माझं सगळं लहानपण इथं गेलय. शाळेच्या सुट्ट्यांमध्ये मी इथं राहायचे, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.
मतदान सुरु आहे, त्यामुळे आता राजकीय कुटुता संपवण्यासाठी सुप्रिया सुळे गेल्या असतील. हे राजकारणातील चांगल उदाहरण आहे. हे सर्व पक्षांनी लक्षात घेतलं पाहीजे, असे राजकीय विश्लेषक विजय चोरमारे यांनी सांगितले.












Users Today : 5
Users Yesterday : 4
Users This Month : 198
Users This Year : 771
Total Users : 42539
Views Today : 7
Total views : 59569
Who's Online : 0