भोसरी, दि. ९ (महाराष्ट्र मंथन):- भोसरीतील भाजपच्या माजी नगरसेविका प्रियांका प्रविण बारसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या हस्ते आज यशवंतराव चव्हाण सेंटर मुंबई येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात अधिकृत प्रवेश केला. यावेळी खासदार सुप्रियाताई सुळे, माजी मंत्री आमदर जितेंद्र आव्हाड, युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, युवक शहराध्यक्ष इम्रान शेख, कार्याध्यक्ष सागर तापकीर यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश घेण्यात आला.
यावेळी बोलताना प्रियांका बारसे म्हणाल्या” भाजपच्या स्थानिक नेतृत्त्वाच्या हुकूमशाही कार्यपद्धतीला कंटाळून तसेच आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या विचाराला प्रेरित होऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करत आहे. भाजपमधील अजून सहकारी आमच्या सोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात येण्यास तयार आहेत. येणाऱ्या काळात प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील साहेब खासदार डॉ अमोल कोल्हे साहेब यांच्या नेतृत्वात तसेच युवकअध्यक्ष इम्रान शेख आणि सहकारी यांच्या सोबतीने पिंपरी चिंचवड शहरात जोमाने काम करणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. यावेळी रजनीकांत गायकवाड, शाहिद शेख, अशरफ शेख, फहिम शेख, मेघराज लोखंडे, समाधान अचलखांब, प्रवीण बारसे तसेच सुहास देशमुख, प्रथमेश बारसे, कान्होपात्रा थोरात, वैशाली पडवळ आधी युवक आणि महिला पदाधिकारी उपस्थित होते.
“आज मुंबई येथे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील साहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आणि भाजपच्या भ्रष्टाचाराला कंटाळून भाजपच्या नगरसेविका प्रियांका बारसे यांनी आमच्या पक्षात प्रवेश केला. आदरणीय शरदचंद्र पवार साहेब यांच्या शिव फुले शाहू आंबेडकर विचारधारेला प्रभावीत होऊन प्रियांका बारसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अधिकृत प्रवेश केला असून लोकसभा निकालाच्या आधीपासून त्या जयंत पाटील साहेब यांच्या संपर्कात होत्या. येत्या काही दिवसात इतर पक्षातील पाच नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करतील असेही इम्रान म्हणाले.










