भोसरी, दि. ३ (महाराष्ट्र मंथन):- AIMIM पक्षाचे भोसरी विधानसभा अध्यक्ष ज्ञानेश्वर बाबु कांबळे यांच्या हस्ते भोसरी एमआयडीसी स्पाईनरोड पोलिस स्टेशनचे नवनियुक्त वरिष्ठ पोलीस निरीक्षक मा. श्री गणेश जामदार साहेब यांचा सत्कार करण्यात आला. भोसरी एमआयडीसी परिसरातील वाढती गुन्हेगारी रोखण्यामध्ये जामदार साहेब यांना यश मिळो अशी सत्कार करतेवेळी आशा व्यक्त करण्यात आली.
यावेळी AIMIM पक्षाचे पिंपरी चिंचवड शहरातील सर्व महिला आणि पुरुष पदाधिकारी उपस्थित होते.
Author: Maharashtra Manthan
Post Views: 119










