पालघर, दि. २४ (वृत्तसंस्था):- आदिवासी निवासी शाळेतील एका 11वीच्या विद्यार्थिनीने अंगावर पेट्रोल ओतून जाळून घेतल्याची भयंकर घटना आदिवासीबहुल पालघर जिल्ह्यात घडली आहे. ही घटना काल मंगळवारी घडली, पण ती आज उजेडात आली. यामुळे एकच खळबळ माजली आहे.
वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार, पालघरच्या आदिवासीबहुल जव्हार तालुक्यातील देहरे स्थित आदिवासी निवासी आश्रम शाळेत मंगळवारी एका विद्यार्थिनीने आत्मदहन केल्याची घटना घडली. मृत विद्यार्थिनी इयत्ता 11 वीच्या वर्गात शिकत होती. तिने हे भयंकर पाऊल का उचलले हे अद्याप स्पष्ट झाले नाही. पोलिस या घटनेचा तपास करत आहेत. मृत तरुणी मंगळवारी दुपारी शाळेच्या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरील छतावर गेली. तिथे तिने अंगावर पेट्रोल ओतून स्वतःला पेटवून घेतले.
आग विझवेपर्यंत झाला कोळसा
आगीच्या ज्वाळांनी वेढलेली विद्यार्थिनी पाहून शाळेत एकच आरडाओरडा माजला. तो ऐकूण आसपासच्या नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला, पण तोपर्यंत विद्यार्थिनी चांगलीच होरपळली होती. तिचा जागीच मृत्यू झाला.
आत्मदहन का केले? स्पष्ट नाही
शालेय प्रशासनाने तत्काळ या घटनेची माहिती स्थानिक पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन स्थितीचा आढावा घेतला. तसेच मृतदेह ताब्यात घेऊन तपास सुरू केला. विद्यार्थिनीने एवढे भयंकर टोकाचे पाऊल का उचलले हे अद्याप स्पष्ट झाले नाही. पण पोलिस या घटनेचा सर्वच अंगाने तपास करत आहेत. या घटनेमुळे शाळेतील इतर विद्यार्थ्यांमध्ये एकच दहशत पसरली आहे.












Users Today : 5
Users Yesterday : 4
Users This Month : 198
Users This Year : 771
Total Users : 42539
Views Today : 8
Total views : 59570
Who's Online : 0