मुंबई, दि. ३ (महाराष्ट्र मंथन):- मुंबई उच्च न्यायालयाने सोमवारी महाराष्ट्र पोलिसांना महंत रामगिरी महाराज यांचे व्हिडीओ काढून टाकण्याचे आदेश दिले आहेत. या व्हिडिओमध्ये त्यांनी प्रेषित मोहम्मद यांच्या विरोधात काही आक्षेपार्ह टिप्पण्या केल्या आहेत. त्यांच्या या विधानामुळे मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्या आहेत.
न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे आणि पृथ्वीराज चव्हाण यांच्या न्यायपीठाने वकील एजाज नक्वी यांनी केलेल्या विनंतीवर पोलिसांना या संबंधीचे तोंडी आदेश दिले आहेत. ज्यामध्ये त्यांनी निदर्शनास आणले की ‘वादग्रस्त’ व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सर्वत्र आहे आणि त्यामुळे जातीयवाद निर्माण होऊ शकतो. तसेच समाजात तणावाचे वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे.
एफआयआरची चौकशी करण्याचे आदेश
या संबधी न्यायालयाने म्हटले की, योग्य पावले उचला आणि सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून व्हिडिओ हटवले जातील याची खात्री करा. न्यायमूर्ती मोहिते-डेरे यांनी पोलिसांची बाजू मांडलेल्या अतिरिक्त सरकारी वकील प्राजक्ता शिंदे यांना हे तोंडी आदेश दिले आहेत. न्यायपीठाने शिंदे यांना वादग्रस्त व्हिडिओ काढून टाकण्यासाठी पोलिस विभागाच्या सायबर सेल शाखेची मदत घेण्याचे आणि महंत रामगिरी यांच्याविरुद्ध दाखल केलेल्या अनेक प्रथम माहिती अहवालांची म्हणजेच एफआयआरची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.
व्हिडिओंमुळे ‘अशांतता’ निर्माण होण्याची शक्यता
या संदर्भात वकील नक्वी यांच्यामार्फत दाखल केलेल्या याचिकेनुसार, सिन्नर तालुक्यातील एका कार्यक्रमात रामगिरी महाराज यांनी प्रेषित मुहम्मद आणि त्याच्या सहा वर्षांच्या मुलीशी असलेल्या कथित संबंधांबद्दल काही आक्षेपार्ह टिप्पणी केली होती. वकिलांनी खंडपीठाला सांगितले की, सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर लगेचच राज्यभर निषेध व्यक्त करण्यात आला. व्हिडिओंमुळे ‘अशांतता’ निर्माण होण्याची शक्यता त्यांनी ठळकपणे मांडली आणि कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होऊ शकते असेही न्यायालयाला सांगितले. तसेच आक्षेपार्ह टिप्पण्यांविरोधात काही लोक ‘उपोषणाला बसले आहेत’ तसेच दुसऱ्या एका याचिकेत उपस्थित असलेल्या वकिलाने रामगिरी महाराज यांना अटक करण्याची विनंती केली.
महाराष्ट्रातील विविध पोलिस ठाण्यात एकूण 58 एफआयआर दाखल
दरम्यान, सरकारी वकील शिंदे यांनी न्यायपीठाला सांगितले की, रामगिरी महाहराज यांच्या विरुद्ध महाराष्ट्रातील विविध पोलिस ठाण्यात एकूण 58 एफआयआर दाखल करण्यात आल्या आहेत. या सर्व 58 एफआयआर एकत्र केल्या गेल्या आहेत. तसेच या प्रकरणाचा तपास जिथे ही घटना घडली त्या सिन्नरमधील एमआयडीसी पोलिस स्टेशनकडे सोपवण्यात आला आहे. त्या नुसार या प्रकरणाची सुनावणी 2 आठवड्यांसाठी तहकूब करण्यात आली आहे.












Users Today : 5
Users Yesterday : 4
Users This Month : 198
Users This Year : 771
Total Users : 42539
Views Today : 8
Total views : 59570
Who's Online : 0