निगडी, दि. ६ (महाराष्ट्र मंथन):- मागील अनेक दिवसांपासून आणि गंभीर गुन्हे दाखल असलेला वॉन्टेड आरोपी नामे कृष्णासिंग भारतसिंग बावरी वय 39 यास खंडणी विरोधी पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी मोठ्या शिताफीने निगडी ओटा स्कीम येथून अटक केली.
- दिनांक 05/06/2024 रोजी खंडणी विरोधी पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार असे अनेक दिवसापासुन पाहिजे असलेला आरोपीचा शोध घेत असतान बातमी मिळाली की, निगडी पोलीस स्टेशन गुन्हा रजि.नंबर 277/2024 भादवि कलम 454,380,527,504,507,143,144,147,148,149, सह आर्म अॅक्ट 4, (25) सह महाराष्ट्र पोलीस अधिनियम सन 1951चे कलम 37 (1) (3) सह 135 या गुन्हयांतील अनेक दिवसापासुन पाहिजे असलेला आरोपी नामे कृष्णासिंग भारतसिंग बावरी वय 39 हा निगडी परिसरात आला आहे. अशी माहिती मिळाल्याने त्यास ओटा स्किम,निगडी येथुन ताब्यात घेवुन पुढील कारवाई कामी निगडी पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आला आहे.
- सदरची कामगिरी मा.श्री. विनय कुमार चौबे (पोलीस आयुक्त), मा. श्री डॉ. शशिकांत महावरकर (पोलीस सह आयुक्त) मा.श्री. वसंत परदेशी (अपर पोलीस आयुक्त), मा.श्री. संदिप डोईफोडे (पोलीस उप-आयुक्त गुन्हे), मा.श्री. बाळासाहेब कोपनर (सहा.पोलीस आयुक्त गुन्हे-02) यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक श्री देवेंद्र चव्हाण, अमंलदार चौधरी, मावसकर यांनी केली आहे.
Author: Maharashtra Manthan
Post Views: 438












Users Today : 5
Users Yesterday : 4
Users This Month : 198
Users This Year : 771
Total Users : 42539
Views Today : 6
Total views : 59568
Who's Online : 0