मुंबई दि. ११ (महाराष्ट्र मंथन):- अभिनेता अरबाज खान यांची पूर्वपत्नी आणि बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा यांचे वडील अनिल अरोरा यांनी वांद्रे येथील इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. आत्महत्येचं कारण अद्याप समोर आलेलं नाही.
बांद्रा पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून अधिक तपास करत आहेत. आलमेडा पार्क इथल्या इमारतीच्या ६ व्या मजल्यावरून त्यांनी उडी मारून जीवन संपवलं. (malaika arora father suicide)
मलायकाचे वडील अनिल अरोरा यांनी बुधवारी सकाळी आत्महत्या केली. सकाळी ९ च्या सुमारास त्यांनी इमारतीच्या सहाव्या मजल्यावरून उडी मारली. बांद्यातील घरात ही घटना घडली. आत्महत्येमागचं कारण अद्याप समोर आलेलं नाही. अनिल अरोरा यांच्या आत्महत्येच्या घटनेनंतर मलायकाचा घटस्फोटीत पती अरबाज खान कुटुंबियांसह बांद्यातील मलायकाच्या घरी पोहोचला आहे. अनिल अरोरा यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.












Users Today : 5
Users Yesterday : 4
Users This Month : 198
Users This Year : 771
Total Users : 42539
Views Today : 6
Total views : 59568
Who's Online : 0