भोसरी, दि. ६ (महाराष्ट्र मंथन):- येथील एका १२ वर्षाच्या मुलीने दोन युवकांच्या त्रासाला आणि लैंगिक छळाला कंटाळून तिच्या राहत्या घरी आत्महत्या केली असून मुलीच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादिवरून पोलिसांनी याप्रकरणी त्या दोन्ही युवकांना अटक केली असून भोसरी पोलिस ठाण्यात भादवि कलम ३०६, ३५४ (ड) बालकांचे लैंगिक अत्याचारापासुन संरक्षण कायदा कलम ८,१२ प्रमाणे अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. क्षितीज लक्ष्मण पराड रा. वय २० रा. भोसरी आणि तेजस पांडुरंग पठारे वय १९ रा. चरोली अशी दोन्ही अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे असल्याचे पोलिसांनी संगितले. तसेच सदर आरोपींना न्यायालयासमोर उभे केले असता न्यायालयाने दोघांना ८ तारखेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली असल्याचे तपास अधिकारी भोसरी पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक खाडे यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.
याबाबत संपूर्ण माहिती अशी की, नमूद तारीख वेळी व ठिकाणी फिर्यादी यांची मुलगी वय १२ वर्ष हिने भोसरी येथे राहते घराचे बेडरुम मध्ये दोरीचे सहायाने गळफास घेवुन आत्महत्या केली असुन, फिर्यादी यांनी पाहीलेले सी.सी.टी.व्ही फुटेज तसेच मुलीचे खिशामध्ये मिळालेला मोबाईल नंबर यावरुन आरोपी क्रं १ व त्याचा मित्र आरोपी क्रं २ यांनी फिर्यादी यांची मुलगी हिचा वारंवार पाठलाग करुन तिचा लैंगिक छळ केल्यानेच तिने राहते घरामध्ये त्यांचे त्रासाला कंटाळुन आत्महत्या केली, असा आरोप फिर्यादी असलेल्या मुलीच्या वडिलांनी केला आहे. पुढील तपास भोसरी पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक खाडे हे करीत आहेत.












Users Today : 2
Users Yesterday : 3
Users This Month : 206
Users This Year : 779
Total Users : 42547
Views Today : 7
Total views : 59602
Who's Online : 0