पिंपरी, दि. १३ (महाराष्ट्र मंथन):- पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय अंतर्गत सायबर पोलीस ठाणे कार्यान्वित होऊन ६० लाख रुपये ऑनलाईन फसवणुकीचा पहिला गुन्हा दाखल पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे हद्दीत सायबर गुन्हयांची तसेच सायबर तक्रारींची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने त्यांना आळा घालण्यासाठी तसेच सदर गुन्हयांचा व्यवस्थितरित्या कौशल्यपुर्ण व जलदगतीने तपास व्हावा याकरीता मा. पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड श्री. विनयकुमार चौबे यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे महाराष्ट्र शासन राजपत्र, वर्ष १० अंक ५३ / गुरुवार, जुन, १३, २०२४ असाधारण क्रमांक ९९, चे अधिसुचना अन्वये पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय स्तरावर सायबर पोलीस ठाणे कार्यान्वित करण्यात आले आहे. त्यानंतर तात्काळ सांगवी, पुणे येथील एका इसमाची शेअर ट्रेडींगमध्ये ऑनलाईन ६० लाख रुपयांचे झालेले फसवणुकीचा साबयर पोलीस ठाणे येथे दि. १२/१०/२०२४ रोजी पहिला गुन्हा दाखल करण्यात आला असुन त्याचा तपास सायबर पोलीस ठाणेकडुन सुरु करण्यात आला आहे. नवीन सायबर पोलीस ठाणे कार्यान्वित झाल्याने सायबर तक्रारींचा व्यवस्थितरित्या कौशल्यपूर्ण व जलदगतीने तपास तसेच सायबर गुन्हयांना प्रतिबंध होण्यास मदत होणार आहे.












Users Today : 5
Users Yesterday : 4
Users This Month : 198
Users This Year : 771
Total Users : 42539
Views Today : 6
Total views : 59568
Who's Online : 0