निगडी, दि. १९ (महाराष्ट्र मंथन):- “एकता चौकातील अवैधरित्या खणलेल्या खड्ड्यामुळे नागरिक आणि वाहनचालकांचे जीवन धोक्यात” या मथळ्याखाली “महाराष्ट्र मंथन” मध्ये दिनांक १७ सप्टेंबर रोजी वृत्त प्रसिद्ध करण्यात आले होते. यामध्ये निगडी एकता चौकामध्ये मुख्य रस्त्यावर अवैधरित्या घडलेल्या खड्ड्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या नागरिक, रुग्ण, गरोदर महिला, लहान मुले, शालेय विद्यार्थी, आणि वाहन चालक यांच्या जीविताला कशाप्रकारे धोका निर्माण झाला आहे याबाबत सविस्तर वृत्त दिले होते.

सदर वृत्ताची दखल त्वरित घेत महानगरपालिकेने केवळ २४ तासांमध्ये सदर वृत्तातील खड्ड्यामध्ये डांबर आणि इतर कारवाई करून तो खड्डा बुजवला. या कारवाईमुळे परिसरातील नागरिकांनी सुटकेचा विश्वास सोडला आणि “महाराष्ट्र मंथन”चे अभिनंदन केले.
Author: Maharashtra Manthan
Post Views: 172












Users Today : 0
Users Yesterday : 7
Users This Month : 72
Users This Year : 472
Total Users : 42240
Views Today :
Total views : 58520
Who's Online : 0