पिंपरी, दि. ८ (महाराष्ट्र मंथन):- पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह यांची नाशिकच्या महाकुंभमेळाच्या आयुक्तपदी बदली झाली आणि त्यांच्या जागी प्रभारी आयुक्त म्हणून पुणे मेट्रोचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शेखर सिंह यांच्या तीन वर्षांच्या कारकिर्दीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते माधव पाटील यांनी समाजमाध्यमांवर सडकून टीका केली. शेखर सिंह यांच्या या कार्यकाळाचे वर्णन पाटील यांनी “ते आले, त्यांनी लुटलं आणि आता महाकुंभमेळ्यात पाप फेडायला चाललेत” असे प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.
तीन वर्षाच्या कार्यकाळात काही लोकप्रतिनिधींची मर्जी सांभाळत पिंपरी चिंचवडकरांच्या कराची अमाप लूट केली. आयुक्त हे किमान ५००० कोटी रुपये शहरातून भ्रष्ट मार्गाने घेऊन आता कुंभमेळा लुटायला चालले आहेत. त्यांना गेल्या तीन वर्षात अनेक वेळा कुत्र्यांच्या नसबंदी संदर्भात, नदीचे जलपर्णी साफसफाई करण्यात किती घोटाळा झाला याची श्वेतपत्रिका काढा हे सांगून सांगून दमलो. पालिकेचे IT चे ५ कोटींचे कंत्राट १५० कोटींना दिले, १.२५ किलोमीटरचा रस्ता ८ कोटीत दिला. चिखली येथे अनेक उद्योजकांच्या उद्योगांवर बुलडोझर फिरवून त्यांच्या स्वप्नांची राखरांगोळी केली. २०० कोटीची हरितबॉन्ड म्हणजेच भीकबाँड काढून हरित कंत्राटदारासाठी भीक मागितली, असे अनेक धक्कादायक आरोप पाटील यांनी या पत्रकात केले आहे.
नवीन येणारे प्रभारी आयुक्त श्रावण हर्डीकर कोणाच्या हातातले भावले नसतील हीच अपेक्षा माधव पाटील यांनी यामध्ये व्यक्त केली आहे.













Users Today : 2
Users Yesterday : 4
Users This Month : 195
Users This Year : 768
Total Users : 42536
Views Today : 2
Total views : 59564
Who's Online : 0