ईद ए मिलाद च्या मिरवणुकीमध्ये डीजे ची परवानगी दिल्यास पोलिसांविरोधात न्यायालयीन कारवाई करणार..!

पिंपरी, दि. २५ (शफीक शेख):- ईद-ए-मिलादच्या पारंपरिक मिरवणुकीमध्ये डीजेचा वापर पूर्णपणे बंद न झाल्यास मिस फराह चॅरिटेबल फाउंडेशनने आता पोलिस प्रशासनाच्या निष्क्रियतेविरोधात कायदेशीर कारवाई करणार असल्याचा इशारा दिला आहे.

मिस फराह चॅरिटेबल फाउंडेशनच्या वतीने गेल्या *पाच-सहा वर्षांपासून* ईद-ए-मिलाद मिरवणुकीतील डीजेचा मुद्दा सातत्याने उपस्थित केला जात आहे. यासाठी केवळ स्थानिक पोलीस ठाण्यांपुरती तक्रार मर्यादित ठेवण्यात आलेली नाही. *पुणे पोलीस आयुक्त (CP), सर्व DCP, सर्व ACP, Crime Branch, Special Branch, सर्व झोनचे संबंधित पोलीस अधिकारी तसेच सर्व पोलीस ठाण्यांचे PI* यांना वेळोवेळी पत्रे, निवेदने आणि तक्रारी देण्यात आल्या आहेत.

डीजेचा थर कमी करणे हा उपाय नाही; डीजेच पूर्णपणे बंद झाला पाहिजे. मिरवणुकीत येणारे मोठे डीजे नेमके कोण आणते? त्यांचे आयोजन कोण करते? त्यासाठी आर्थिक व्यवस्था कोण करते? याबाबत प्रशासनाने आवश्यक ती चौकशी करावी.

फाउंडेशनच्या माहितीनुसार, *२०२२ मध्ये डीजेच्या मोठ्या आवाजामुळे एका ज्येष्ठ नागरिकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची घटना घडली होती.* याशिवाय मोठ्या आवाजामुळे ज्येष्ठ नागरिक, लहान मुले, आजारी व्यक्ती आणि परिसरातील नागरिकांना त्रास होत असल्याच्या अनेक घटना वर्षानुवर्षे समोर येत आहेत.

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांची अंमलबजावणी करा*

ध्वनीप्रदूषणा संदर्भातील सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश तसेच लागू असलेल्या कायदे व नियमांची काटेकोर अंमलबजावणी करणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे.

डीजे बंद न झाल्यास आणि पोलिसांनी कायद्याप्रमाणे कारवाई केली नाही, तर पोलिस प्रशासनाच्या निष्क्रियतेविरोधात Contempt of Court (न्यायालयाचा अवमान) बाबत योग्य न्यायालयीन कार्यवाही दाखल करण्याचा पर्याय आम्ही स्वीकारणार आहोत, असा स्पष्ट इशारा *मिस फराह चॅरिटेबल फाउंडेशन* च्या वतीने देण्यात आला आहे. फाउंडेशनने स्पष्ट केले आहे की, ही मागणी ईद-ए-मिलादच्या धार्मिक मिरवणुकीच्या विरोधात नाही. उलट ईद-ए-मिलादची मिरवणूक अधिक *शांततापूर्ण, धार्मिक, शिस्तबद्ध, डीजेमुक्त आणि समाजाच्या धार्मिक भावनांना साजेशी* असावी, हीच संस्थेची भूमिका आहे.

Leave a Comment

READ MORE