
निगडी. दि. 17 (शफिक शेख) :- अनेक समस्यांनी वेढलेल्या निगडी अमरधाम स्मशानभूमीच्या दुरवस्थेस कारणीभूत असणा-या ठेकेदारांना काळया यादीत टाकण्यात यावे आणि स्मशानभूमीतील सर्व समस्या दूर करण्यात याव्यात, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते सचिन काळभोर यांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त शेखर सिंग यांना केली आहे.

निगडी अमरधाम स्मशान भूमी दुरावस्था झाली असून नादुरूस्त झालेल्या संडास बाथरूममुळे महिला वर्ग तसेच पुरुष नागरिकांना खूप त्रास सहन करावा लागत आहे, संडास बाथरूम स्वच्छता करण्यात येत नाही, नवीन संडास बाथरूम बांधकाम सुरू असून पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासन नवीन संडास बाथरूम कामाला गती देत नाही, गवत वाढलेले असून मच्छर मोठ्या प्रमाणावर झाले आहे, सीमाभित तुटलेल्या अवस्थेत आहे, स्मशान भूमी लोखंडी गेट तुटलेल्या अवस्थेत आहे, सुरक्षा कर्मचारी ह्यांना राहण्यासाठी व्यवस्था करण्यात यावी, अंत्यविधी करण्यासाठी ज्या लोखंडी शेड मध्ये अंत्यविधी करण्यात येत आहे त्या ठिकाणी लोखंडी पत्रे तुटलेले आहे अशा एक ना अनेक समस्यांनी वेढलेल्या अमरधाम स्मशानभूमी पुन्हा सर्व सोयीसुविधांनी युक्त करण्याचे आदेश माननीय आयुक्तांनी द्यावेत आणि यांस जबाबदार असणा-या अशा ठेकेदारांना काळया यादीत टाकून त्यांच्यावर शासकीय नियमाप्रमाणे कारवाई करण्याचे आदेशही मा. आयुक्तांनी द्यावेत, अशी मागणी काळभोर यांनी सर्व नागरिकांतर्फे आयुक्तांनी केली आहे.










