दिल्ली, दि. ६ (महाराष्ट्र मंथन) :- बृजभूषण शरण सिंह विरोधात आंदोलन करणाऱ्या स्टार कुस्तीगीर पहेलवान बजरंग पुनिया, साक्षी मलिक, विनेश फोगाट व इतर पहलवान हे गेली १४ दिवस आंदोलन करीत आहेत. आता या आंदोलनात पहेलवानांच्या मदतीसाठी वंचित बहूजन युवा आघाडी चे नेते सुजात आंबेडकर हे धावून आले आहेत. युवा एल्गार मेळावामध्ये आणि त्यानंतर पत्रकार परिषदेत जंतर मंतर वर आंदोलन करणाऱ्या ऑलम्पियन कुस्तीपटू ह्यांना युवा आघाडीचे वतीने समर्थन जाहीर केले होते. उद्या ७ मे रोजी सुजात आंबेडकर हे जंतर मंतर वर दुपारी १२ वाजता दाखल होतील, असे राजेंद्र पातोडे प्रदेश महासचिव वंचित बहूजन युवा आघाडी महाराष्ट्र प्रदेश यांनी सांगीतले.
Author: Maharashtra Manthan
Post Views: 91










