पिंपरी, दि. 5 (महाराष्ट्र मंथन):- मागील काही दिवसांपूर्वी राज्यात निर्माण झालेल्या राजकीय गोंधळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये दोन गट पडले. एका बाजूला पक्षाच्या अजितदादा गटाकडून प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी शहराचे अध्यक्ष, कार्याध्यक्ष, महिला अध्यक्षांची निवड नव्याने केली तर दुसरीकडे जयंत पाटील यांनी पिंपरी चिंचवड शहरात कार्यकारी समिती जाहीर केली. त्यानुसार सुनिल गव्हाणे, इम्रान शेख, काशिनाथ जगताप, देवेंद्र तायडे, मयूर जाधव, काशिनाथ नखाते, राजन नायर यांच्यावर शहरात कार्य पुढे सुरु ठेवण्याची जबाबदारी देण्यात आली.
या समितीने रावेत येथील एक हॉलमध्ये सहविचार बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीला शरद पवार यांच्या सोबत असलेल्या असंख्य कार्यकर्त्यांनी उपस्थिती लावली. या पुढील काळातील पिंपरी चिंचवड शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संघटनेची वाटचाल, आगामी उपक्रम, संघटनेच्या विविध निवडी, महापालिकेचे कामकाज आणि शहरातील प्रश्न यावरील पक्ष संघटनेची भुमिका इ. बाबतीत या बैठकीत चर्चा करण्यात आली. लवकरच पिंपरी चिंचवड शहरात पक्षाचे भव्य कार्यालयाचे उद्घाटन होणार असल्याचे या बैठकीत जाहीर करण्यात आले.
विचारसरणी सोडून भाजपच्या सत्ताकेंद्री राजकारणाबरोबर जाणं आम्हाला मान्य नाही. त्यामुळे आम्ही स्वतंत्रपणे राष्ट्रवादी काँग्रेसच्या मूलभूत समतावादी विचारांवर श्रद्धा ठेवून शहरात शरद पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली राजकारण व समाजकारण करणार आहोत, असा निर्धार यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी केला.
यावेळी माधव पाटील, राजू खंडागळे, विजय पिरंगुटे, सचिन निंबाळकर, राहुल नेवाळे, अनिल भोसले, संदिप चव्हाण, योगेश सोनवणे, संतोष माळी, सागर भुजबळ, राजेश हरगुडे, के डी वाघमारे, बिरुदेव मोटे, अण्णा पाखरे, रोहित जाधव, राजेश बरसागळे, पंडित कांबळे, सचिन सकाटे, सुयश भोसले, किशोर पवार, जावेद पठाण, शादाब खान, नितीन मोरे, उमेश डोरले, राजेश माने, सलीम डांगे, विशाल जाधव, ज्योती निंबाळकर, स्वप्नाली आसोले, वैशाली पवार, पंचशीला आगळे, अश्विनी आगळे, नाजुका वाल्हे, सुप्रिया कवडे, संजीवनी पुराणिक, ज्योती जाधव,सुजाता पाटील, कमरूनिसा शेख, ओम क्षीरसागर, पियूष अंकुश,शाहिद शेख,केतन होके, शादाब खान यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.










