पिंपरी, दि. २६ (महाराष्ट्र मंथन) :- ओबीसी सेल महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष राज राजापूरकर यांनी विशाल अनंतराव जाधव यांना पिंपरी चिंचवड शहर जिल्हा अध्यक्षपदी नियुक्त केल्याचे पत्र दिले. ओबीसी सेल नियुक्ती पत्र देताना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रदेशाध्यक्ष (ओबीसी सेल) राज राजापुरकर, महिला प्रदेशाध्यक्ष अॅड वंदनाताई चव्हाण, संसदरत्न खासदार सुप्रियाताई सुळे, युवक शहराध्यक्ष इमरान शेख, कामगार नेते काशिनाथ नखाते, सचिन निंबाळकर, विशाल क्षीरसागर, विशाल शिंदे, शाहिद शेख, अशोक हरपळे, पिंपरी चिंचवड महिला शहराध्यक्ष ज्योती निंबाळकर, सुवर्णा वाळके, कविता देवकर, दिपाली पारखे, मनीषा निंबाळकर उपस्थित होते.
पिंपरी चिंचवड शहर जिल्ह्यातील ओबीसी तसेच बारा बलुतेदार यांच्याशी घट्ट नाळ असलेले नेहमी जन माणसात वावरणारे म्हणून विशाल जाधव यांची शहराला ओळख आहे.
यावेळी विशाल जाधव यांनी माध्यम प्रतिनिधींशी बोलताना सांगितले, दिलेल्या संधीचे सोने करणार तळागाळातील प्रत्येक उपेक्षित व्यक्तीपर्यंत पोहोचून प्रशासनातील समाजातील चुकीच्या गोष्टींबद्दल आवाज उठवत राहणार, प्रत्येक क्षण समाजासाठी अर्पण करणार पिंपरी चिंचवड शहर ही कामगारांची नगरी म्हणून ओळखली जाते येथील कामगारांचे प्रश्न, व्यापारी वर्गाचे प्रश्न, शोषित पीडितांच्या समस्या, वाढती गुन्हेगारी, रस्त्यांच्या, ट्राफिकच्या समस्या, युवकांच्या बेरोजगारांच्या समस्या सोडवण्यासाठी मी कटिबद्ध आहे, अशा भावना व्यक्त केल्या.
अॅड वंदनाताई चव्हाण, सुप्रियाताई सुळे यांनी देखील विशाल जाधव यांच्या कार्याचे कौतुक करत भविष्यात विशाल जाधव यांच्याकडून खूप सार्या अपेक्षा असल्याचे सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नेहमीच विशाल जाधव यांच्या पाठीशी भक्कपणे उभा राहील असेही मत त्यांनी व्यक्त केले.










