https://x.com/qureshi_al71679/status/1712366830130499881?s=20
☝️संपूर्ण पोस्ट पाहण्यासाठी वरील लिंकवर क्लिक करावे.
निगडी, दि. १३ (महाराष्ट्र मंथन) :- शिस्त व अपील नियम, १९७९चे कलम,१२(१) चे उल्लंघन केल्याप्रकरणी ‘फ’ क्षेत्रीय कार्यालयाचे संबंधित अधिकारी आणि कर्मचारी यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करावी अशा मागणीचे पत्र सामाजिक कार्यकर्ते श्री. आलम युसुफ कुरेशी यांनी महाराष्ट्र नगर विकास विभाग, महाराष्ट्रचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे आणि महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल यांच्याकडे ट्विटरद्वारे केली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की ९ ऑक्टोबर रोजी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने आयोजित ‘फ’ क्षेत्रिय कार्यालयातील जनसंवाद सभेत अधिकारी आणि कर्मचारी यांनी शिस्त व अपील नियम, १९७९चे कलम,१२(१) चे अनुसार कोणत्याही शासकीय अधिकारी अथवा कर्मचारी यांना कर्तव्यावर (ऑनड्युटी) असताना नागरिकांकडून व इतर संघटना यांच्याकडून (नातेवाईकांखेरीज) कोणतीही घन पदार्थ (भोजन) स्वीकारणे बंधनकारक असताना त्या नियमाचे उल्लंघन करून भोजन (चहा व बिस्किट) स्वीकारले तसेच सुमारे अर्धा तास कामकाज बंद केल्याप्रकरणी श्री. कुरेशी यांनी ट्वीटरमार्फत सादर केलेल्या विडियोमधील अधिकारी आणि कर्मचारी यांच्यावर शिस्तभंगाची करावाई करण्याचे आदेश देवून माननीय आयुक्त शेखर सिंह यांनी समाजात एक आदर्श स्थापन करून संविधानाचा मान राखावा, अशी विनंती श्री. कुरेशी यांनी केली आहे.










