भोसरी, दि. ७ (महाराष्ट्र मंथन) :- महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणूक लवकरच जाहीर होणार आहेत. त्यामध्ये भोसरी विधानसभा मतदार संघातून ऑल इंडिया मजलीस ए इत्तेहादूल मुस्लिमीन पक्षाकरिता आपल्याला संधी देण्यात यावी अशी मागणी एआयएमआयएम पक्षाचे भोसरी विधानसभा अध्यक्ष श्री. ज्ञानेश्वर बाबू कांबळे यांनी महाराष्ट्र राज्याचे महासचिव श्री. अकीलभाई मुजावर व पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष श्री. धम्मराज साळवे यांच्याकडे केली आहे. तसे पत्र त्यांनी त्यांनी प्रत्यक्ष त्यांना भेटून दिले आहे.
यावेळी त्यांनी आपल्या उमेदवारीसाठी अनेक बाबीचा देखील उल्लेख केलेला आहे तसेच त्यांना अनेक सामाजिक संघटना व विद्यार्थी संघटना यांनी पाठिंबा जाहीर केला आहे. बहुजनाच्या हितासाठी प्रयत्न करणारे, अशी लोकांमध्ये त्यांची ओळख आहे भोसरी विधानसभामध्ये त्यांचे कार्य व पक्षाचे काम उल्लेखनीय आहे, असे सांगितले.
मी भोसरी विधानसभा मतदार संघातील ४० वर्षांपासूनच रहिवासी असून सामाजिक आणि राजकीय चळवळीत सक्रिय असून २०१६ पासून सलग ८ वर्षांपासून पक्षासाठी काम करीत आहे. मी सातत्याने आंबेडकरी व बहुजन चळवळीत कार्यरत असून या मतदार संघाचा संपूर्ण अभ्यास माला आहे. या विधानसभा मतदार सघात दलित आणि मुस्लिमांची संख्या भरपूर असून पक्षाने मला संधी दिली तर विधानसभा निवडणूकीत पक्षाला निश्चितच निर्णायक मते मिळतील, असा विश्वास कांबळे यांनी यावेळी या पत्रकातून दिला.










